‘कहा है मेलघाट का राजकुमार..?’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 10:30 PM2018-01-28T22:30:18+5:302018-01-28T22:31:31+5:30

‘कहा है मेलघाट का राजकुमार..? धरती निगल गई या आसमाँ खा गया’ असेच काहीसे म्हणण्याची वेळ पोलिसांवर शोधमोहिमेदरम्यान आली आहे.

'Is the Prince of Melghat ..?' | ‘कहा है मेलघाट का राजकुमार..?’

‘कहा है मेलघाट का राजकुमार..?’

googlenewsNext
ठळक मुद्देमध्यप्रदेशात रेकी : पोलिसांच्या दोन चमू शोधमोहिमेत

आॅनलाईन लोकमत
परतवाडा : ‘कहा है मेलघाट का राजकुमार..? धरती निगल गई या आसमाँ खा गया’ असेच काहीसे म्हणण्याची वेळ पोलिसांवर शोधमोहिमेदरम्यान आली आहे. पोलीसदप्तरी फरार मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेलांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांची एक चमू मध्यप्रदेशात जाऊन मंगळवारी रित्या हातांनी परतल्याची माहिती आहे.
धारणी तालुक्यातील खारी येथील प्रकरणात राजकुमार पटेल यांच्यासह सुमारे ७० सहकाऱ्यांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आरोपींच्या यादीत असलेल्या पटेलांचा अंतरिम जामिन अचलपूर न्यायालयाने १२ जानेवारी रोजी फेटाळला. तेव्हापासून राजकुमार पटेल भूमिगत आहेत. त्यांच्या शोधार्थ धारणी पोलीस आणि गुन्हे अन्वेषण विभाग अशा दोन चमू मोहिमेवर आहेत. मात्र, पोलिसांना १२ दिवसानंतरसुद्धा राजकुमार पटेलांचा शोध लागलेला नाही.
दामजीपुऱ्यात जावयांकडे शोध
राजकुमार पटेलांचा शोध पोलीस यंत्रणा युद्धस्तरावर घेत आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता एलसीबीच्या चमूने पटेलांचे जावई आणि माजी आमदार सतीशसिंह चव्हाण यांच्या घरी जाऊन चौकशी केली. मात्र, त्यांना शोध लागला नाही. धारणी येथील घरासह नातेवाइकांकडेसुद्धा पोलिसांनी रेकी केली. मात्र, शोध लागला नाही.
३ फेब्रुवारीला सुनावणी
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात राजकुमार पटेल यांच्यातर्फे अभिवक्ता आनंद परचुरे आणि रजनीश व्यास ३ फेब्रुवारी रोजी बाजू मांडणार आहेत. न्यायालय काय निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजकुमार पटेल यांचा धारणी पोलीस आणि एलसीबी अशा दोन चमू शोध घेत आहेत. मात्र, अजूनपर्यंत त्यांचा शोध लागला नाही.
- विशाल नेऊल
उपविभागीय पोलीस अधिकारी, धारणी.

Web Title: 'Is the Prince of Melghat ..?'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.