‘प्रिन्स’ने पटकावले सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:15 AM2021-08-26T04:15:30+5:302021-08-26T04:15:30+5:30

फोटो पी २५ डॉग फोल्डर आंतरराष्ट्रीय श्वान दिवस : शहर पोलिसांच्या ताफ्यात सात प्रशिक्षित श्वान अमरावती : आंतरराष्ट्रीय श्वान ...

Prince wins gold | ‘प्रिन्स’ने पटकावले सुवर्णपदक

‘प्रिन्स’ने पटकावले सुवर्णपदक

googlenewsNext

फोटो पी २५ डॉग फोल्डर

आंतरराष्ट्रीय श्वान दिवस : शहर पोलिसांच्या ताफ्यात सात प्रशिक्षित श्वान

अमरावती : आंतरराष्ट्रीय श्वान दिवस हा दरवर्षी २६ ऑगस्ट रोजी सर्व जातीची कुत्री पाळण्यास प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो. सध्या बरेच लोक भटक्या कुत्र्यांना दत्तक घेण्याची कल्पना आपलीशी करीत आहेत. रस्त्यांवर घोळक्याने राहणारी ही कुत्री अतिशय हुशार आणि चटकन शिकणारी असतात. ती धावण्यासाठी उत्तम साथी असतात. माणसाचा सगळ्यात जवळचा मित्र म्हणून कुत्री सर्वांत चांगली असतात. श्वानाच्या हुशारीचे कौतुक तरी काय सांगावे. शहर पोलीस आयुक्तालयातील बीडीडीएस (बॉम्ब शोधक व नाशक पथक) मधील प्रिन्स नामक श्वानाने २०१५ साली झालेल्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे.

शहर आयुक्तालयातील बीडीडीएसमध्ये प्रिन्स आणि सिंघम हे दोन लेब्रेडॉर जातीचे श्वान आहेत. त्यांना स्निपर डॉग संबोधले जाते. पांढऱ्या रंगाचा प्रिन्स हा सन २०१४ पासून, तर तीन वर्षांचा सिंघम २०१८ पासून शहर पोलीस दलासोबत आहे. या दोन्ही श्वानांना अमरावती व पुणे येथे वर्षभर प्रशिक्षण देण्यात आले. बीडीडीएसमध्ये प्रिन्स सिंघमला ‘एक्सक्लुझिव्ह’देखील संबोधले जाते. संवेदनशील स्थळांसह गर्दीच्या ठिकाणी बीडीडीएसकडून दैनंदिन तपासणी करण्यात येते. त्यात दररोज प्रिन्स सिंघम सहभागी असतात. त्यांच्याशिवाय ती तपासणीच पूर्ण होत नाही. याशिवाय शहर गुन्हे शाखेकडेदेखील ५ प्रशिक्षित श्वान आहेत. घटनास्थळाच्या पंचनाम्यावेळी ते श्वान मोलाची भूमिका बजावतात.

------------------------कुत्रा दत्तक घ्या

एखादे रेस्क्यू सेंटर किंवा डॉग शेल्टर शोधा. तिथे भेट द्या आणि कुत्र्यांशी मैत्री करण्याचा प्रयत्न करा. कुत्र्याचे वैद्यकीय तपशील आणि इतर माहिती घ्या. आवश्यक त्या प्रक्रिया पाळा. दत्तक विधानावर स्वाक्षरी करा.

-------------------------------तुम्हाला तुमच्या आयुष्यात कुत्र्याची गरज का आहे?

कुत्रे संरक्षणात्मक असतात. कुत्रे स्वार्थी नसतात. एकटेपणावर मात करण्यास मदत करतात. कुत्रा हा सर्वांत निष्ठावंत प्राणी आहे. म्हणून जर तुम्ही कुत्रा पाळायला तयार असाल, तर एक पिलू घ्या. कारण लहानपणापासूनच कुत्र्याशी संबंध असणे महत्त्वाचे आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये, जे मोठे कुत्रे विकत घेतात ते त्या कुत्र्यांशी भावनिक बंध निर्माण करू शकत नाहीत आणि यामुळे कुत्रा त्यांच्याशी एकनिष्ठ होऊ शकत नाही.

Web Title: Prince wins gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.