महिला, बाल कल्याणास प्राथमिकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 09:55 PM2018-02-09T21:55:37+5:302018-02-09T21:56:10+5:30

अन्य प्रशासकीय कामकाजाच्या तुलनेत महिला व बालकांचा विकास साधण्यास प्राधान्य देऊ, त्याच्यासाठी असलेल्या शासकीय योजनांची अंमलबजावणी पूर्णत: करण्यासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही मनीषा खत्री यांनी दिली.

Priority for women, child welfare | महिला, बाल कल्याणास प्राथमिकता

महिला, बाल कल्याणास प्राथमिकता

Next
ठळक मुद्देमनीषा खत्री : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी रुजू

आॅनलाईन लोकमत
अमरावती : अन्य प्रशासकीय कामकाजाच्या तुलनेत महिला व बालकांचा विकास साधण्यास प्राधान्य देऊ, त्याच्यासाठी असलेल्या शासकीय योजनांची अंमलबजावणी पूर्णत: करण्यासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही मनीषा खत्री यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारीपदी शुक्रवारी खत्री रुजू झाल्या. यावेळी त्या बोलत होत्या.
मूळ हरियाणातील सोनपत जिल्ह्यातील मनीषा खत्री या २०१४ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. बॅचमध्ये ३५ वा रँक असलेल्या खत्री यांनी यापूर्वी कोल्हापूर व दिल्ली येथे केंद्रीय मंत्रालयात सहसचिव म्हणून काम केले आहे. त्या पाचोरा (जळगाव) येथे एसडीओ होत्या.
पदभार स्वीकारताना खत्री म्हणाल्या, मानवविकास निर्देशांक ज्या ठिकाणी आहे, त्यालाही प्राधान्य दिले जाईल. कुपोषणमुक्तीसाठी झेडपीच्या माध्यमातून अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला जाईल. प्रशासनाची धुरा सांभाळत प्रशासनच काम करेल. मेळघाटातील परंपरा व तेथील विषय वेगवेगळे आहेत. ते सोडविण्यासाठी सर्व विभागाचा समन्वय साधून काम करणार असल्याची स्पष्टोक्ती त्यांनी दिली. यावेळी डेप्युटी सीईओ कैलास घोडके, प्रकल्प संचालक के.एम. अहमद, अ‍ॅडिशन सीईओ विनय ठमके, माया वानखडे, कॅफो रवींद्र येवले, कार्यकारी अभियंता राजेंद्र डोंगरे, प्रमोद तलवारे व अन्य खातेप्रमुख उपस्थित होते.

कर्मचाºयांच्या प्रश्नांसाठी वैयक्तिक आढावा
जिल्हा परिषदेतील कर्मचाºयांच्या पदोन्नती, बढतीबाबतचे प्रश्नही मार्गी लावले जातील व इतर प्रलंबित विषयाचा वैयक्तिक आढावा घेऊन प्रश्न सोडविणार असल्याचे मनीषा खत्री यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: Priority for women, child welfare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.