कारागृहात कोरोना नियंत्रणात, चार कैदी आयसोलेटेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:13 AM2021-05-10T04:13:17+5:302021-05-10T04:13:17+5:30

अमरावती : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात रविवारपासून कठोर संचारबंदी लागू झाली. कोरोना संक्रमित रुग्ण, मृत्युसंख्या दर दिवशी वाढत ...

In prison corona control, four prisoners isolated | कारागृहात कोरोना नियंत्रणात, चार कैदी आयसोलेटेड

कारागृहात कोरोना नियंत्रणात, चार कैदी आयसोलेटेड

Next

अमरावती : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात रविवारपासून कठोर संचारबंदी लागू झाली. कोरोना संक्रमित रुग्ण, मृत्युसंख्या दर दिवशी वाढत आहे. मात्र, येेथील मध्यवर्ती कारागृहाने प्रतिबंधात्मक नियमावलीचे काटेकोर पालन करून कोरोना नियंत्रणात आणला आहे. हल्ली कारागृहात चार कैदी संक्रमित असून, ते होमगार्डच्या विभागीय कार्यालयात आयसोलेटेड आहेत. परंतु, एकही कैदी रुग्ण गंभीर नसून, येथील कोविड रुग्णालयात दाखल नसल्याची माहिती आहे.

मध्यवर्ती कारागृहात महिला व पुरुष असे १,१०० हून अधिक कैदी आहेत. कोराेनाच्या पहिल्या लाटेत कारागृहातील ६८ कैदी व कर्मचाऱ्यांना कोरोनाने ग्रासले होते. मात्र, एप्रिलपासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली असताना, कारागृहात कोरोना नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. कैद्यांची नियमित आरोग्य तपासणी, मास्कचा वापर, सुरक्षित अंतर आदी नियमांचे काटेकोर पालन करण्यात येत आहे. त्यामुळे आजमितीला १,१०० कैदी संख्या असताना चार कैदी कोरोना संक्रमित आढळून आल्याची माहिती आहे. पहिल्या लाटेत एक कर्मचारी व एक कैदी कोरोनाचा बळी ठरला होता. त्यानंतर कारागृहात कोरोना नियमांचे तंतोतंत पालन करण्यात येत आहे. नियमित आरोग्य तपासणीदरम्यान ताप, खोकला, सर्दीचे रुग्ण आढळल्यास औषधोपचार केला जात आहे. होमगार्डच्या कार्यालयात साकारण्यात आलेल्या कोविड केअर केंद्रात संक्रमित कैद्यांवर उपचार होत असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी एस.आय. थोरात यांनी दिली.

------------------

नवीन कैद्यांना १४ दिवस क्वारंटाईन

न्यायालयाच्या आदेशानुसार कारागृहात पाठविल्या जाणाऱ्या प्रत्येक नवीन कैद्यांना तात्पुरत्या कारागृहात १४ दिवस क्वारंटाईन नियमावली अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे थेट कारागृहात नवीन कैद्यांची कोरोना चाचणी झाल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. नियमित आरोग्य तपासणीमुळेसुद्धा कैदी कोरोना संसर्गापासून लांब राहत असल्याचे चित्र आहे.

Web Title: In prison corona control, four prisoners isolated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.