कैद्याला दुसऱ्या गुन्ह्यात दहा महिन्यांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:12 AM2021-08-01T04:12:33+5:302021-08-01T04:12:33+5:30

----------------- अचलपूर न्यायालयाचा निकाल, पहिल्या गुन्ह्याच्या शिक्षेसाठी कारागृहात परतवाडा : पूर्वीच कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या चोराला रात्री-अपरात्री घरात घुसून ...

The prisoner was sentenced to ten months in prison for a second offense | कैद्याला दुसऱ्या गुन्ह्यात दहा महिन्यांची शिक्षा

कैद्याला दुसऱ्या गुन्ह्यात दहा महिन्यांची शिक्षा

Next

-----------------

अचलपूर न्यायालयाचा निकाल, पहिल्या गुन्ह्याच्या शिक्षेसाठी कारागृहात

परतवाडा : पूर्वीच कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या चोराला रात्री-अपरात्री घरात घुसून चोरी करण्याच्या प्रकरणात अचलपूर येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी क्रमांक ३ एस.टी. सहारे यांच्या न्यायालयाने दहा महिन्यांची शिक्षा व एक हजार रुपयाचा दंड शुक्रवारी ठोठावला. शेख कलीम ऊर्फ बाबा शेख निसार (२५, रा. अचलपूर) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे.

मोहन गुलाबराव रोही (रा. माळवेशपुरा) याच्या घरातून अज्ञात चोरट्याने २४ एप्रिल २०१९ रोजी दाराची साखळी तोडून रोख दहा हजार व दोन मोबाईल असा १५ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला होता. अचलपूर पोलिसांनी भादंविचे कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक उपनिरीक्षक हरीश कथलकर यांनी केला व आरोपी शेख कलीम उर्फ बाबा शेख निसार (२५, रा. अचलपूर) याला अटक करून चोरी केलेला माल जप्त केला. त्याच्याविरुद्ध सबळ पुरावा प्राप्त झाल्याने दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी,क्रमांक ३, अचलपूर यांनी सदर प्रकरणात आरोपी शेख कलीम ऊर्फ बाबा शेख निसार याला दोषी ठरवून भादंविचे कलम ४५७ अन्वये १० महिने व १४ दिवस शिक्षा आणि एक हजार रुपये दंड व दंडाची रक्कम न भरल्यास पुन्हा १५ दिवस साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. कलम ३८० अन्वये १० महिने व १४ दिवस शिक्षा आणि एक हजार रुपये दंड व दंडाची रक्कम न भरल्यास पुन्हा १५ दिवस साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता सी.यू. हाडोळे यांनी कामकाज पाहिले.

बॉक्स

आरोपी पूर्वीच कारागृहात

शेख कलीम हा एक वर्षापासून पूर्वी केलेल्या गुन्ह्यात दोषी आढळल्याने ठोठालेली शिक्षा भोगत आहे. आता परत त्याला या गुन्ह्यातील शिक्षा भोगावी लागणार आहे.

Web Title: The prisoner was sentenced to ten months in prison for a second offense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.