पाल्यांच्या गळाभेटीने कैदी गहिवरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 10:11 PM2018-11-11T22:11:19+5:302018-11-11T22:11:56+5:30

उत्तुंग पाषाण भिंतीआड न्यायालयाच्या आदेशाने विविध गुन्ह्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या कैदी बांधवांना मुला-बाळांची भेट होताच गहिवरून आले. काही क्षणातच कैद्यांना हातून झालेल्या कृत्याची जाणीवदेखील झाली. निमित्त होते येथील मध्यवर्ती कारागृहात गळाभेटीचे.

Prisoners are bereaved by the throats of birds | पाल्यांच्या गळाभेटीने कैदी गहिवरले

पाल्यांच्या गळाभेटीने कैदी गहिवरले

Next
ठळक मुद्देकारागृहात दिवाळी उत्सव : १६ वर्षाआतील मुलांचा गळाभेट उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : उत्तुंग पाषाण भिंतीआड न्यायालयाच्या आदेशाने विविध गुन्ह्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या कैदी बांधवांना मुला-बाळांची भेट होताच गहिवरून आले. काही क्षणातच कैद्यांना हातून झालेल्या कृत्याची जाणीवदेखील झाली. निमित्त होते येथील मध्यवर्ती कारागृहात गळाभेटीचे.
गृहविभागाने बंदीजनांसाठी सुधारणा व पुनर्वसन हा उपक्रम राबविण्याचे धोरण अंगिकारले आहे. चार भिंतीच्या आत शिक्षा भोगत असताना कैद्यांच्या मनात वैफल्याची जाणीव होऊ नये, यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याच धर्तीवर दिवाळी उत्सवाचे औचित्य साधून ‘गळा भेट’ हा अभिनव कार्यक्रम घेण्यात आला. यात १६ वर्षाआतील कैद्यांचे पाल्यांना भेट घालून दिली. यात २६ बंदीजनांच्या ४८ मुला-मुलींनी पालकांसोबत संवाद साधला. कैद्यांनी आई, बहीण, भावाचे क से सुरु आहे, हे विचारताना घरची ख्यालीखुशाली जाणून घेतली. यादरम्यान कैद्यांच्या डोळ्यांत नकळत अश्रू तरळले.
पोटच्या गोळ्याला गोडधोड भरविताना कैद्यांना आपण मोठी चूक केली, ही जाणीव झाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आले. कारागृह प्रशासनाच्यावतीने लाडू, करंजी, अनारसे, शेव, बिस्कीट, सोनपापडी, चकली आदी पदार्थ उपलब्ध करु न दिले होते. बंदीजन आणि पाल्यांमध्ये संवाद सुरू असताना त्यांच्यातील नात्यांची भावनिक वीण घट्ट असल्याचे दिसून आले. त्यानंतर कैद्यांच्या पाल्यांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली. कारागृह अधीक्षक रमेश कांबळे, वरिष्ठ तुरूंगाधिकारी सुनील पाटील, तुरूंगाधिकारी चंद्रकांत कदम, राजेंद्र वडते, महेंद्र जोशी, गोपाल नांदे आदींच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.

Web Title: Prisoners are bereaved by the throats of birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.