इंटरनेट क्रांतीमुळे गोपनीयता धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 10:32 PM2018-01-02T22:32:44+5:302018-01-02T22:33:08+5:30

इंटरनेट क्रांतीतून निर्माण झालेल्या सायबर गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी राज्यभरात 'ट्रान्सफारमिंग महाराष्ट्र' प्रकल्पांतर्गत सायबर गुन्ह्याविषयी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.

Privacy threat due to internet revolution | इंटरनेट क्रांतीमुळे गोपनीयता धोक्यात

इंटरनेट क्रांतीमुळे गोपनीयता धोक्यात

googlenewsNext
ठळक मुद्देट्रान्सफार्मिंग महाराष्ट्र अभियान : मार्गदर्शकांकडून सावधगिरीचे धडे

आॅनलाईन लोकमत
अमरावती : इंटरनेट क्रांतीतून निर्माण झालेल्या सायबर गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी राज्यभरात 'ट्रान्सफारमिंग महाराष्ट्र' प्रकल्पांतर्गत सायबर गुन्ह्याविषयी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मंगळवारी अभियंता भवनात पार पडलेल्या कार्यक्रमात 'ट्रान्सफारमिंग महाराष्ट्र' अभियानाला प्रारंभ झाला. पोलीस आयुक्तांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
सायबर गुन्हेगार गुन्हेगारीच्या नवनवीन पध्दती शोधून नागरिकांची फसवणुक करीत आहे. त्यामुळे नागरीकांची खासगी गोपनियतेला मोठा धोका निर्माण झाला आहे. सायबर गुन्हेगारी रोखण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले असले तरी, त्याचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सक्षम आहे. मात्र, याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती आवश्यक आहे. या 'ट्रान्सफॉरमिंग महाराष्ट्र' अभियानाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. कार्यक्रमाला पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, अकोला येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य बी.जे.शेखर, अ‍ॅक्सिस बँकेचे सह उपाध्यक्ष निशिकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, प्रदीप चव्हाण, एपीआय कांचन पांडे, पोलीस उपनिरीक्षक रवि राठोड यांनी सायबर गुन्ह्याविषयी मार्गदर्शन केले. अनोळखी व्यक्तींची 'फ्रेन्ड रिक्वेस्ट' स्वीकारू नका, वैयक्तिक माहिती, फोटो सोशल मीडियावर प्रसारित करू नका, आॅनलाईन ओळख झालेल्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास टाकू नका. आपले पाल्य इंटरनेटवर काय पाहतात, काय यावर लक्ष ठेवा, एटीएमचा वापर करताना सावध रहा. पिनकोड कोणाला दिसणार नाही, याची दक्षता घ्या, वेबसाईटवरील जाहिरातून विश्वासघात होऊ शकतो, त्याची शहानिशा करा. संचालन पीएसआय पंकज कांबळे, आभार प्रदर्शन पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण यांनी केले. यावेळी नागरिकांसह विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Web Title: Privacy threat due to internet revolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.