खासगी दवाखाने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 05:00 AM2020-03-31T05:00:00+5:302020-03-31T05:00:37+5:30

अचलपूर येथे मोठ्या प्रमाणावर एमबीबीएस, बीएएमएस, बीयूएमएस, डीसीएच डिग्रीप्राप्त खासगी दवाखाने आहेत. संचारबंदीच्या काळात सरकारने खासगी दवाखाने सुरू ठेवण्याचे आदेश दिले असताना अचलपुरातील सर्व खासगी दवाखाने बंद आहेत. किरकोळ आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी न करता केवळ आपत्कालीन रुग्णांची तपासणी शासकीय दवाखान्यात करण्यात येत आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेला किरकोळ आजारामुळे हाल सहन करावा लागत आहे.

Private clinics closed | खासगी दवाखाने बंद

खासगी दवाखाने बंद

Next
ठळक मुद्देअचलपुरात रूग्णांचे हाल : उपजिल्हा रूग्णालयावर अतिरिक्त भार

लोकमत न्यूज नेटवर्क
अचलपूर : संपूर्ण भारतात कोरोना संकटामुळे संचारबंदी लागू आहे. त्यामुळे येथील अत्यावश्यक सेवा मेडिकल, किराणा, दूध, पशुखाद्य सोडून सर्व दुकाने बंद आहेत. मात्र, या अडचणीच्या काळात येथील सर्व खासगी दवाखाने बंद असल्यामुळे लहान मुले, वृद्ध रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे. याचा मोठा भार अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयावर पडत आहे. परिणामी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी वाढली आहे.
अचलपूर येथे मोठ्या प्रमाणावर एमबीबीएस, बीएएमएस, बीयूएमएस, डीसीएच डिग्रीप्राप्त खासगी दवाखाने आहेत. संचारबंदीच्या काळात सरकारने खासगी दवाखाने सुरू ठेवण्याचे आदेश दिले असताना अचलपुरातील सर्व खासगी दवाखाने बंद आहेत. किरकोळ आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी न करता केवळ आपत्कालीन रुग्णांची तपासणी शासकीय दवाखान्यात करण्यात येत आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेला किरकोळ आजारामुळे हाल सहन करावा लागत आहे.
सगळीकडे खासगी दवाखाने बंद आहेत. शासकीय दवाखान्यात केवळ आपत्कालीन सेवा दिली जात आहे. यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान-मोठी दुर्घटना, आकस्मिकरीत्या प्रकृतीत बिघाड झाल्यावर कुठे जायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. या गरजेच्या वेळेस अत्यावश्यक सेवा म्हणून खासगी दवाखाने उघडी राहणे गरजेचे आहे. अशावेळी सेवा न देता वैद्यकीय सेवेच्या विरोधात जाणे मानल्या जात आहे.

सगळ्यांनी लॉकडाऊनचे पालन करणे आवश्यक आहे. मी खासगी दवाखान्याबाबत काहीही प्रतिक्रिया देणार नाही. तुम्ही या विषयावर जिल्हाधिकाऱ्यांशी बोला.
- डॉ. सरवत वर्मा, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रूग्णालय

संचारबंदी दरम्यान खासगी दवाखाने बंद ठेवण्याचे कोणतेही आदेश नाही. खासगी डॉक्टरानी व्हिडीओ कॉलवरसुद्धा तपासणी करण्याची तयारी दर्शविली आहे. क्रिटिकलसाठी उघडे आहेत.
- संदीप अपार, उपविभागीय अधिकारी, अचलपूर

अशावेळी खासगी दवाखाने उघढी राहणे आवश्यक आहे. अशावेळी सेवा न देणाºया डॉक्टरांची डिग्री रद्द करण्यात यावी.
- बंटी ककरानिया,
नगरसेवक, अचलपूर

Web Title: Private clinics closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.