जुळ्या शहरात शासकीय डॉक्टरांची खासगी दुकानदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:13 AM2021-05-27T04:13:29+5:302021-05-27T04:13:29+5:30

कोरोनावरही उपचार, वैभव पाटील यांच्या दवाखान्याला परवानगीच नाही लोकमत विशेष परतवाडा नरेंद्र जावरे : अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या ...

Private shop of government doctors in the twin cities | जुळ्या शहरात शासकीय डॉक्टरांची खासगी दुकानदारी

जुळ्या शहरात शासकीय डॉक्टरांची खासगी दुकानदारी

Next

कोरोनावरही उपचार, वैभव पाटील यांच्या दवाखान्याला परवानगीच नाही

लोकमत विशेष

परतवाडा नरेंद्र जावरे : अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर वैभव पाटील यांच्या खासगी दवाखान्याला परवानगीच नसताना, त्यांनी कोरोनासारख्या आजारावर उपचार केल्याचे पुढे आले आहे.

मोर्शी येथील आदर्श शिक्षिका प्रतिभा टिपरे यांच्यावर वेळीच निदान न लावता चुकीच्या औषधोपचार केल्याने उपचारादरम्यान त्यांचा नागपूर येथे मृत्यू झाला. त्याची फिर्याद परतवाडा पोलिसांत पती रवींद्र उत्तमराव टिपरे यांनी दिली. त्यावर पोलिसांचा तपास सुरू आहे. यादरम्यान टिपरे यांनी संबंधित डॉक्टर व त्यांच्या रुग्णालयाविरुद्ध तक्रारीत गंभीर आरोप केले आहे. त्याची दखल जिल्हा आरोग्य यंत्रणा व िजिल्हाधिकार्‍यांनी घेऊन न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.

अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरांत कोरोनासंदर्भात उपचार करण्यासाठी उघडण्यात आलेल्या कोविड सेंटर व दवाखान्यांना जिल्हा शल्यचिकित्सक आणि ग्रामीण भागातील दवाखान्यांना जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी परवानगी दिली आहे. मात्र, उपजिल्हा रुग्णालयात यासंदर्भात कुठलीच कागदपत्रे व माहिती उपलब्ध नसल्याचे अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक सुरेंद्र ढोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

बॉक्स

विनापरवानगी सुरू आहे दवाखाना?

डॉक्टर वैभव पाटील हे अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत आहेत. शासकीय सेवेत कार्यरत असताना डॉक्टरांना खाजगी दवाखाना उघडता येत नाही. असे असताना अचलपूर-परतवाडा मार्गावरील एलआयसी चौकात हा दवाखाना सुरू आहे तो नियमबाह्य असताना, आरोग्य यंत्रणा व नगरपालिका प्रशासनाने कुठलीच कारवाई केलेली नाही. परतवाडा, अचलपूर या जुळ्या शहरांत अजून असे किती विनापरवाना दवाखाने आहेत, याचा शोध घेणे गरजेचे ठरले आहे.

बॉक्स

कोरोनावर उपचार कोणाच्या परवानगीने?

मोर्शी येथील रवींद्र उत्तमराव टिपरे, मृत पत्नी प्रतिमा तसेच त्यांच्या मुलगा व मुलगी या दोघांना कोरोना झाला होता. परतवाडा येथील डॉ. वैभव पाटील यांच्या दवाखान्यात कोरोनासंदर्भात परवानगी नसताना त्यांच्यावर सर्व औषधोपचार करण्यात आला. अव्वाच्या सव्वा देयके व एकाच खोलीत पती-पत्नी असताना, वेगवेगळे बिल देण्यात आले. कोरोनावर उपचार कोणाच्या परवानगीने, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोट

परतवाडा येथील डॉ. वैभव पाटील यांच्या खासगी दवाखान्याला कुठल्याच प्रकारची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यासंदर्भात आम्ही माहिती घेत आहोत.

- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती

Web Title: Private shop of government doctors in the twin cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.