खासगी वायरमनचा वीज खांबावर मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:57 AM2019-07-24T00:57:38+5:302019-07-24T00:58:59+5:30

केबल टाकण्याकरिता विद्युत खांबावर चढलेल्या खासगी वायरमनचा जिवंत तारेला स्पर्श झाल्याने मृत्यू झाला. भातकुली तालुक्यातील साऊर येथे ही घटना घडली. दादाराव श्रीराम सोळंके (४०, रा. साऊर) असे मृताचे नाव आहे. या घटनेनंतर महावितरणच्या शाखा अभियंत्याला घटनास्थळी बोलावण्याची संतप्त गावकऱ्यांची मागणी होती.

Private wireman dies on power pole | खासगी वायरमनचा वीज खांबावर मृत्यू

खासगी वायरमनचा वीज खांबावर मृत्यू

Next
ठळक मुद्देचार तासांनी काढला मृतदेह : महावितरणवर हलगर्जीपणाचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
टाकरखेडा संभू : केबल टाकण्याकरिता विद्युत खांबावर चढलेल्या खासगी वायरमनचा जिवंत तारेला स्पर्श झाल्याने मृत्यू झाला. भातकुली तालुक्यातील साऊर येथे ही घटना घडली. दादाराव श्रीराम सोळंके (४०, रा. साऊर) असे मृताचे नाव आहे. या घटनेनंतर महावितरणच्या शाखा अभियंत्याला घटनास्थळी बोलावण्याची संतप्त गावकऱ्यांची मागणी होती. अखेर निमलष्करी दलाच्या हस्तक्षेपानंतर चार तासांनी मृतदेह खाली काढण्यात आला.
दादाराव सोळंके हे घरगुती वीज दुरुस्तीची कामे १५ वर्षांपासून करीत होते. अनेकदा ते गावातही काम करीत होते. मंगळवारी सकाळी ७:४५ वाजता जनावरांच्या धर्माळाची केबल टाकण्यासाठी संस्थेच्या पदाधिकाºयाने त्यांना नेले. ही नवीन केबल टाकण्यासाठी ते खांबावर चढले. त्यापूर्वी डीबी बॉक्समधील फ्यूज काढून वीजपुरवठा बंद केला होता. मात्र, याच खांबावरून शेतातील वीज पुरवठ्याची तार गेली होती. त्याचा पुरवठा सकाळी ८ वाजता सुरू होतो. त्यामुळे विद्युत प्रवाह सुरू होण्यापूर्वी केबलचे काम पूर्ण करण्याच्या उद्देशाने सोळंके खांबावर चढले होते. मात्र, अचानक कृषिवाहिनीचा विद्युत पुरवठा सुरू झाल्याने त्यांना विजेचा जबर झटका बसला. ते खांबावरच मृतावस्थेत लटकून होते. ही बाब माहिती होताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली.

दोन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली
दादाराव सोळंके यांच्या पश्चात पत्नी चित्रकला, मुलगी वैष्णवी (१६) व मुलगा भावेश (१३) आहेत. दादाराव यांच्या मृत्यूनंतर निराधार झालेल्या त्यांच्या दोन्ही मुलांची शिक्षणाची जबाबदारी निसर्ग इसेंटियल सर्व्हिस, ईसार पेट्रोल पंप व निलांशी फाउंडेशनचे डॉ. श्रीकांत देशमुख व श्रीकांत बोंडे यांनी घेतली. त्यांच्या या पुढाकाराबाबत ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
धर्माळाचा केबल टाकण्याकरिता संस्थेचे सदस्य हिरालाल रामधन लढ्ढा (६०) यांनी दादाराव सोळंके यांना घरी जाऊन सांगितले होते. त्यांच्या सांगण्यावरून सोळंके मंगळवारी खांबावर चढले होते. यातच विजेच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे वलगाव पोलिसांनी हिरालाल लढ्ढाविरुद्ध भादंविच्या कलम ३०४ (सदोष मनुष्यवध) गुन्हा नोंदविला आहे.

Web Title: Private wireman dies on power pole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.