५ ते ७ एप्रिल रोजी पावसाची शक्यता

By admin | Published: April 5, 2016 03:00 AM2016-04-05T03:00:04+5:302016-04-05T03:00:04+5:30

बंगालच्या उपसागराकडून वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यामुळे एप्रिल महिन्यातच कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. शनिवारी

The probability of rain on April 5 to 7 | ५ ते ७ एप्रिल रोजी पावसाची शक्यता

५ ते ७ एप्रिल रोजी पावसाची शक्यता

Next

अमरावती : बंगालच्या उपसागराकडून वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यामुळे एप्रिल महिन्यातच कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. शनिवारी ४२ ते ४३ अंश सेल्सिअस असलेले तापमान सोमवारी ४३.०८ पोहोचले. विदर्भात उष्णतेची लाट आली असून ती पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.
५ ते ७ एप्रिलदरम्यान मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी अकाली पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. उत्तर भारताकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव आता पूर्णपणे ओसरला आहे. पश्चिमी चक्रावात पाकिस्तान आणि आसपासच्या भागात असल्यामुळे जम्मू-काश्मीर आणि हिमालयीन भागात गारपीट आणि पावसाची शक्यता आहे. याउलट राजस्थान, मध्य प्रदेश आणि आसपासच्या भागात उष्णतेची लाट राहणार आहे.
या भागाकडून काही प्रमाणात उष्ण वारे वाहात आहेत, तर बंगालच्या उपसागराकडून बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. उर्वरित भागात कोरडे हवामान असल्यामुळे विदर्भात तापमानात वाढ झाली आहे. पार ४४ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने दुपारच्यावेळी शहरात अघोषित संचारबंदीचे चित्र दिसून येत आहे.

अमरावती
@ ४३.०८अंश
दोन दिवसांत दिवसाच्या तापमानात कमालीची वाढ झाली आहे. सोमवारी जलविज्ञान केंद्र, अमरावती यांनी घेतलेल्या नोंदीनुसार शहरात ४३.०८ अंश तापमानाची नोंद घेण्यात आली. उष्णतेची लाट काही दिवस कायम राहणार आहे. या वाढत्या तापमानामुळे दिवसा शहरातील रस्ते ओस पडत असून अघोषित संचारबंदी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Web Title: The probability of rain on April 5 to 7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.