आरटीई प्रवेशात वयाची अडचण

By admin | Published: February 28, 2017 12:17 AM2017-02-28T00:17:50+5:302017-02-28T00:17:50+5:30

आरटीईअंतर्गत प्रवेश घेण्यासाठी आॅनलाईन अर्ज करताना मुलाच्या वयाची अटक पालकांसाठी जाचक ठरत आहे.

Problems with age in RTE entry | आरटीई प्रवेशात वयाची अडचण

आरटीई प्रवेशात वयाची अडचण

Next

पालक त्रस्त : सहा वर्षांपेक्षा अधिक वयाच्या पाल्यांना प्रवेश मिळेना
अमरावती : आरटीईअंतर्गत प्रवेश घेण्यासाठी आॅनलाईन अर्ज करताना मुलाच्या वयाची अटक पालकांसाठी जाचक ठरत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन गरीब पालकांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.
शासनाच्यावतीने मागील तीन वर्षांपासून दारिद्र्यरेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पाल्यांना बालकांचा मोफत व सक्तीचा अधिनियम २००९ अंतर्गत आरटीई २५ टक्के प्रवेश राखीव ठेवलेले आहेत.
या अंतर्गत अनुसूचित जाती, जमाती, अपंग व पालकांचे वार्षिक उत्पन्न १ लाखापेखा कमी आहे. अशा मुलांना मोफत प्रवेश दिला जातो. या उपक्रमांतगृत् सध्या पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशााठी कागदपत्रांची जुळवाजुळव करीत आहे. परंतु, आॅनलाईन प्रक्रियेत ३० सप्टेंबर २०१७ रोजी सहा वर्ष १० महिन्यापेक्षा जास्त वय होताच मुलांची नोंदणीच होत नाही. त्यामुळे मोफत प्रवेशासाठी धावपळ करून कागदपत्रे एकत्र केलेल्या पालकांची अडचण होत आहे.
एखाद्या मुलाचे वय सप्टेंबर २०१७ मध्ये सात वर्ष पूर्ण होत असल्यास त्याच्या नावापुढे कोणतीच शाळा दाखविली जात नाही. त्यामुळे आरटीई अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी सरसावलेल्या काही पाल्यांच्या पालकांना पदरी निराशा पडली आहे. त्यामुळे याकडे शिक्षण विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)

पालकांची धावपळ
२५ टक्के प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे काढण्यासाठी पालकांची धावपळ होताना दिसत आहे. अधिकारी, कर्मचारी वर्ग निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने पालकांना कागदपत्रांची जुळवाजुळव करताना गैरसोयीचा सामना करावा लागला.

शासनाच्या आदेशानुसार पूर्वी ६ वर्षे ४ महिन्यांपर्यंत प्रवेश देता येत होता. नव्या अध्यादेशानुसार ६ वर्षे १० महिन्यांपर्यंत प्रवेश देता येतो. शासन आदेशानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे.
- किशोर पुरी,
शिक्षण विस्तार अधिकारी

Web Title: Problems with age in RTE entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.