नांदगावच्या समस्या शहर काँग्रेसने मांडल्या पालकमंत्र्याच्या दालनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:11 AM2021-07-26T04:11:43+5:302021-07-26T04:11:43+5:30

नांदगाव खंडेश्वर : नांदगाव शहराच्या समस्या शहर काँग्रेसने पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या दालनात मांडल्या. शहरातील ११०० हून अधिक अतिक्रमण ...

The problems of Nandgaon were presented by the city Congress in the office of the Guardian Minister | नांदगावच्या समस्या शहर काँग्रेसने मांडल्या पालकमंत्र्याच्या दालनात

नांदगावच्या समस्या शहर काँग्रेसने मांडल्या पालकमंत्र्याच्या दालनात

Next

नांदगाव खंडेश्वर : नांदगाव शहराच्या समस्या शहर काँग्रेसने पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या दालनात मांडल्या. शहरातील ११०० हून अधिक अतिक्रमण भोगवटाधारकांना त्यांचे अतिक्रमण नियमनानुकूल करून देण्याची कार्यवाही तीन ते चार महिन्यात करावी, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी यावेळी दिले.

पालकमंत्र्यांसह माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी पवनीत कौर, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, मुख्याधिकारी मीनाक्षी यादव यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात यासंबंधी झालेल्या बैठकीला नांदगावचे माजी नगराध्यक्ष अक्षय पारस्कर, शहर काँग्रेस अध्यक्ष अमोल धवसे, माजी सभापती फिरोज खान, निशिकांत जाधव, गजानन मारोटकर, प्रदीप ब्राह्मणवाडे, अवधूत बनसोड, अजय लाड आदी उपस्थित होते.

चांदी प्रकल्पावरून शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी एक्सप्रेस फिडर चे रखडलेले काम, अग्निशमन वाहनाची रखडलेली निविदा प्रक्रिया दोन ते तीन महिन्यात पूर्ण करण्याचे व वाहन उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. शहराचा विकास आराखडा, मटण मार्केट, नगरपंचायतची नवीन इमारत यासंदर्भात कोरोना संपल्यावर तातडीने निधी देण्याचे आश्‍वासनही पालकमंत्र्यांनी दिले.

250721\1444-img-20210725-wa0048.jpg

नांदगाव शहराच्या समस्या मांडल्या काँग्रेसने पालकमंत्र्यांच्या दालनात

Web Title: The problems of Nandgaon were presented by the city Congress in the office of the Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.