संत्रा उत्पादकाने विदर्भात सर्वप्रथम उभारले प्रक्रिया केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 07:41 PM2018-01-12T19:41:54+5:302018-01-12T23:06:03+5:30
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या सालबर्डी येथे एका शेतक-याने स्वबळावर संत्रा प्रक्रिया केंद्र व पॅकिंग युनिटची उभारणी केली आहे.
गोपाल डाहाके
मोर्शी (अमरावती) - सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या सालबर्डी येथे एका शेतक-याने स्वबळावर संत्रा प्रक्रिया केंद्र व पॅकिंग युनिटची उभारणी केली आहे. विदर्भात एखाद्या शेतकºयाने उभारलेले हे बहुदा पहिलेच प्रक्रिया केंद्र आहे.
नीलेश सुरेशराव रोडे असे या प्रगतिशील शेतकºयाचे नाव आहे. विषमुक्त संत्रा उत्पादन करताना तो ब्रँडच असावा यासाठी स्वतंत्र पॅकिंग युनिटची गरज होती. फळ जादा काळ टिकण्यासाठी त्यावर वेष्टण लावणे गरजेचे असते. अन्य ठिकाणाहून हे काम करून घेतल्यास कमाईचा मोठा भागा खर्च होणार असल्याने स्वत:चे पॅकिंग युनिट नीलेश रोडे यांनी उभारले. येथे संत्र्यावर प्रोसेसिंग, व्हॅक्सिंग, पॅकिंग होत असते. या युनिटचा लाभ अन्य शेतकºयांनादेखील होणार आहे. विशेष म्हणजे, शासनाची कोणतीही मदत त्यासाठी मिळालेली नाही.
संत्र्याचा उफराटा प्रवास
वरुड, मोर्शी तालुक्यातील संत्री दिल्ली, पंजाब, हरियाणा, बिहार, श्रीनगर, केरळ, ओरिसा आणि बांग्लादेश येथे पाठविली जातात. हा नाशवंत माल असल्याने संत्राउत्पादकांचा कमी, तर हाताळणी करणाºया व्यापाºयांचा घसघशीत फायदा होतो.
पंजाबमध्ये आहेत वैयक्तिक प्रक्रिया केंद्रे
पंजाबमध्ये संत्र्याला फक्त १० रुपये प्रतिकिलो दर आहे. या परिसरात विदर्भापेक्षा संत्र्याचे सरासरी उत्पादन २५ टक्क्यांनी कमी आहे. तरीदेखील बºयाच शेतकºयांनी वैयक्तिक स्वरूपात संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारले आहेत. वरूड-मोर्शी परिसरामध्ये संत्र्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असूनदेखील संत्रा प्रक्रिया केंद्रे नाहीत.
सरकारतर्फे शेतकºयांसाठी नियम-अटी शिथिल करून प्रोत्साहन देण्यात यावे. यामुळे जास्तीत जास्त शेतकरी वॅक्सिंग युनिट उभारतील. स्थानिक बाजारपेठ व मुंबईसारख्या शहरात रेल्वे स्थानकावर संत्री विकण्याकरिता जागा उपलब्ध करून देण्यात यावी.
नीलेश रोडे, संत्रा उत्पादक शेतकरी