वृंदावन कॉलनीत प्राध्यापकाची आत्महत्या, कारण अस्पष्ट

By प्रदीप भाकरे | Published: March 19, 2023 10:54 PM2023-03-19T22:54:31+5:302023-03-19T22:56:58+5:30

अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापकाने संपवलं जीवन

Professor commits suicide in Vrindavan Colony reason unclear | वृंदावन कॉलनीत प्राध्यापकाची आत्महत्या, कारण अस्पष्ट

वृंदावन कॉलनीत प्राध्यापकाची आत्महत्या, कारण अस्पष्ट

googlenewsNext

अमरावती : येथील न्यू राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यरत एका प्राध्यापकाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना १९ मार्च रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील वृंदावन कॉलनी येथे उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

प्रा. डॉ. मनीष मोतीसिंह बैस (५२) असे मृताचे नाव आहे. न्यू राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत मनीष बैस हे प्रशांतनगर येथे पत्नीसह वास्तव्यास होते. त्यांचा मुलगा मुंबई येथे शिक्षण घेत आहे. मनीष बैस यांचे वृंदावन कॉलनी येथेही घर आहे. अधूनमधून ते या घरी जात होते. रविवारी सायंकाळी मुंबई येथील मुलाने त्यांना मोबाइलवर कॉल केले. मात्र, मनीष बैस यांनी कॉल उचलले नाहीत. त्यामुळे मुलाने त्याच्या मित्राला वृंदावन कॉलनी येथील घरी जावून बघायला सांगितले. त्यानुसार मित्र वृंदावन कॉलनी येथील घरी गेला. यावेळी त्याला मनीष बैस हे पंख्याला दोरीच्या मदतीने गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आले. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर गाडगेनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेहाला शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले. मनीष बैस यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस तपास सुरू आहे.

Web Title: Professor commits suicide in Vrindavan Colony reason unclear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.