प्राध्यापकाचे कुटुंबीयासह बेमुदत उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 09:26 PM2020-02-14T21:26:40+5:302020-02-14T21:26:51+5:30

उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर प्रवीण गायकवाड या प्राध्यापकाने कुटुंबीयांसह गुरुवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे

professor Fast with family members | प्राध्यापकाचे कुटुंबीयासह बेमुदत उपोषण

प्राध्यापकाचे कुटुंबीयासह बेमुदत उपोषण

Next

अमरावती - बुलडाणा जिल्ह्यातील लोणार येथील कै. दुर्गा बमनेरू विज्ञान महाविद्यालयास राज्य शासनाने नव्याने दिलेले पदभरतीचे ना-हरकत प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी येथील उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर प्रवीण गायकवाड या प्राध्यापकाने कुटुंबीयांसह गुरुवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील रहिवासी प्रवीण गायकवाड हे महाविद्यालयात सन २०१६-१७ या वर्षात पूर्णवेळ सहायक प्राध्यापक (प्राणिशास्त्र, खुला प्रवर्ग) या पदावर कार्यरत होते. कालांतराने संस्थाचालकांनी अर्थव्यवहार करून २५ ते ३० प्राध्यापकांना सेवेतून काढले. हल्ली हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे प्राध्यापक भरतीसाठी मान्यता दिल्यास पुन्हा आर्थिक व्यवहाराला बळ मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे. ना-हरकरत प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी प्रवीण गायकवाड यांच्यासह वडील माणिक गायकवाड, आई चंद्रकला गायकवाड, पत्नी विद्या, मुलगी प्रांजली, पुतण्या अभंग, सृजन असे सर्व गायकवाड कुटुंबीय बेमुदत उपोषणास बसले आहेत.

Web Title: professor Fast with family members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.