कापूसतळणीच्या इसमाकडून प्रतिबंधित गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:12 AM2021-04-13T04:12:12+5:302021-04-13T04:12:12+5:30
रहिमापूर पोलिसांची कारवाई, १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल वनोजा बाग : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कापूसतळणी येथे रहिमापूर पोलिसांनी रविवारी ...
रहिमापूर पोलिसांची कारवाई, १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल
वनोजा बाग : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कापूसतळणी येथे रहिमापूर पोलिसांनी रविवारी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून पाच पोती भरून असलेला गुटखा जप्त केला. कापूसतळणी येथेच त्याची विक्री करताना एका व्यक्तीला पोलिसांनी वनोजा बाग येथे अटक केली आहे.
सय्यद अहसान सय्यद अहमद (४५) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध भादंविचे कलम २६९, २७०, २७२, २७३, १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. कापूसतळणी येथील ओम बिल्डिंग येथील दुकानाच्या बाजूला गुटखा विक्री करीत असताना ही कारवाई पोलिसांनी केली. तो आजूबाजूच्या खेड्यांवरही प्रतिबंधित गुटखा विकत होता. पीएसओ सचिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी चंद्रकांत खंडार, विशाल, प्रफुल रायबोले, मोना इंगळे यांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. दोन नायलॉन पोत्यांमध्ये नजर ९०० गुटख्याची १३५०० रुपये किमतीची ९० पाकिटे, दोन नायलॉन पोत्यांमध्ये हॉट गुटख्याची १७८२० रुपये किमतीची १३५ पाकिटे, अन्य एका गुटख्याची २८५० रुपये किमतीची गुटख्याची १९ पाकिटे, पान पराग गुटख्याची २४०० रुपयांची २० पाकिटे तसेच दोन पोत्यांमध्ये ४६२० रुपये किमतीची १४० पाकिटे असा ४१ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल तसेच एक लाखाची एमएच २१ बी ६२५ क्रमांकाची चारचाकी
त्याच्याकडून जप्त करण्यात आली. उपनिरीक्षक संजय मार्कंड पुढील तपास करीत आहेत.