बंदीजणांचे कविसंमेलनातून प्रबोधन
By admin | Published: May 15, 2017 12:15 AM2017-05-15T00:15:32+5:302017-05-15T00:15:32+5:30
सूर्योदय ते सूर्यास्त अशी दिनचर्या जगणाऱ्या बंदीजणांच्या मनात सामाजिकतेची जाणीव निर्माण व्हावीे, ....
कैद्यांनीही सादर केल्या कविता : सूर्योदय, संडे मिशन संस्थेचा उपक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सूर्योदय ते सूर्यास्त अशी दिनचर्या जगणाऱ्या बंदीजणांच्या मनात सामाजिकतेची जाणीव निर्माण व्हावीे, यासाठी येथील सूर्योदय बहुउद्देशीय संस्था आणि संडे मिशनच्यावतीने कारागृहात कविसंमेलन शुक्रवारी पार पडले. यावेळी परिवर्तनवादी कविंनी एकापेक्षा एक सरस कविता सादर करून बंदीजणांच्या मनात सामाजिकतेचा भाव निर्माण केला.
अध्यक्षस्थानी कारागृह अधीक्षक रमेश कांबळे होते. प्रमुख अतिथी म्हणून उपअधीक्षक भाईदास ढोले, मंडळ तुरुंगाधिकरी व्ही.एस. संदाशिव, संजय घरडे, आर.एस. तायडे, सुनंदा बोदिले आदी उपस्थित होते. कविसंमेलानाचा प्रारंभ कुमुदिनी मेश्राम यांच्या ‘कल्याण हो मानवा’ या कवितेने झाला. त्यानंतर हसन मेंदी या बंदीजणाने ‘जहाँ भी जायेगां रोशनी लुटायेंगा’ ही कविता सादर करून सर्वांचे लक्ष वेधले. एस. कुमार मेश्राम यांनी ‘बहोत दिनो से चाहत थी उसकी’ तर कारागृह अधीक्षक रमेश कांबळे यांनी ‘जेल नाही ही तर बंदीशाळा’ ही कविता सादर करून त्यांनी कारागृहाचे महत्त्व विशद केले. पद्माकर मांडवधरे यांनी ‘गर्भात यातनांचा डोंगर घेऊन जन्म मला दिला’, भाईदास ढोले यांनी ‘जेलर मारतात सुधरण्यासाठी’, विलास थोरात यांनी ‘कालची आठवण आज लक्षात असून दे’, सुकेशनी घरडे यांनी ‘सकाळी, सकाळी सुर्योदय निघता तुझ्या प्रेमाला पाहत राहावे’ ही कविता भाव खाऊन गेली. त्यानंतर आनेकांनी सामाजिक जाणीवेच्या कविता सादर केल्यात.