प्रतिष्ठाने बंद, व्यापाऱ्यांनी केला हिंसाचाराचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 01:17 AM2018-01-05T01:17:56+5:302018-01-05T01:18:12+5:30
कोरेगाव भीमा प्रकरणाच्या अनुषंगाने अमरावतीत व्यापाऱ्यांनी बुधवारी कडकडीत बंद पाळला. तरीही काही युवकांनी बंद प्रतिष्ठानांवर दगडफेक आणि व्यापाऱ्यांना जबर मारहाण केली. या घटनेचा विविध व्यापारी संघटनांनी गुरुवारी अर्धदिवस दुकाने बंद ठेवून निषेध नोंदविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरेगाव भीमा प्रकरणाच्या अनुषंगाने अमरावतीत व्यापाऱ्यांनी बुधवारी कडकडीत बंद पाळला. तरीही काही युवकांनी बंद प्रतिष्ठानांवर दगडफेक आणि व्यापाऱ्यांना जबर मारहाण केली. या घटनेचा विविध व्यापारी संघटनांनी गुरुवारी अर्धदिवस दुकाने बंद ठेवून निषेध नोंदविला.
व्यावसायिकांनी जवाहरगेट परिसरातून दुपारी १२ च्या सुमारास दुचाकी मार्च काढला. हा मार्च जिल्हाधिकारी अभिजित बांगर व पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या कार्यालयापर्यंत होता. दोन्ही अधिकाऱ्यांना व्यापाऱ्यांनी निवेदन दिले. व्यापाऱ्यांना करण्यात आलेली मारहाण, दुकानांची केलेली तोडफोड, परिसरात पसरविलेली दहशत याप्रकरणी दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यातून करण्यात आली. व्यावसायिकांनी प्रतिष्ठाने दुपारी २ वाजेपर्यंत बंद ठेवली होती. ३ जानेवारी रोजी जवाहर गेट परिसरात बंद प्रतिष्ठानांवर अज्ञातांनी हातात झेंडे घेऊन दगडफेक केली. या प्रकाराला व्यापाऱ्यांनी विरोध केला असता, व्यापाऱ्यांनाच जबर मारहाण केली गेली. दहशत पसरविणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने व्यापारी व परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. ही सर्व गंभीर बाब लक्षात घेता, या परिसरात उत्पात माजविणाºयांचा शोध घेऊन कठोर कारवाईची आग्रही मागणी केली. सराफा व्यापारी असोसिएशन, सुर्वणकार संघ असोसिएशन, बर्तन व्यापारी असोसिएशन, अनाज व्यापारी असोसिएशन, होलसेल किराणा मर्चंट असोसिएशन, कन्ज्युमर प्रॉडक्ट असोसिएशन, आॅइल इंडस्ट्रीज सराफा व्यापारी असोसिएशन, सक्करस्थ मित्र परिवार, हिंदू हुकरी संघटना, जवाहर मित्र परिवार आदी संघटनांचा यात समावेश होता. निवेदन देताना मुन्ना सेवक, अविनाश चुटके, राजू गायनकर, नगरसेवक प्रवीण हरमकर, विलास इंगोले, गोविंद सोमाणी, सुनील शेटये, किशोर वडनेरकर, राजू घाणड, अजय तिनखेडे, जयेश राजा, गौरीशंकर हेडा, नितेश शर्मा, मनोज खंडेवाल, प्रणित सोनी, मधुकर लढा, विशाल राठी, सचिन करूले, दिलीप काकडे, गणेश गौर, विवेक कलोती, संगीता बुरंगे, सुधीर बोपुलकर, मनोज साखरकर व व्यापाºयांसह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.