एचटीबीटी बियाण्यांच्या लागवडीस मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:10 AM2021-05-28T04:10:26+5:302021-05-28T04:10:26+5:30

अमरावती : शेतकऱ्यांनी खरिपासाठी कपाशीच्या बीजी-२ या शासनमान्यता बियाण्यांची लागवड करावी. याशिवाय मान्यता नसलेले कोणतेही बियाणे पेरणी करू नये. ...

Prohibition of cultivation of HTBT seeds | एचटीबीटी बियाण्यांच्या लागवडीस मनाई

एचटीबीटी बियाण्यांच्या लागवडीस मनाई

Next

अमरावती : शेतकऱ्यांनी खरिपासाठी कपाशीच्या बीजी-२ या शासनमान्यता बियाण्यांची लागवड करावी. याशिवाय मान्यता नसलेले कोणतेही बियाणे पेरणी करू नये. यामुळे शेताचे तसेच पर्यावरणाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. पर्यावरण कायद्यानुसार अनधिकृत बियाण्यांचा वापर, साठवणूक हा कायद्यानुसार गुन्हा ठरविण्यात आलेला आहे. यासाठी एक लाखांचा दंड व पाच वर्षे कारावासाची तरतूद असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

मान्यता नसलेले बनावट व बेकायदेशीर एचटीबीटी बियाणे आरआर, राऊंड अप बीटी, तणावरची बीटी, विड गार्ड आदी नावाने विक्री होण्याची शक्यता आहे. असे बियाणे अधिकृत नसून अशा बियाण्यांचे उत्पादन व विक्री करण्यास शासनाची अनुमती नसल्याचे जिल्हा अधीषक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी सांगितले. अशा प्रकारच्या बियाण्यांची विक्री केल्यानंतर पावती दिली जात नाही. या बियाण्यांच्या पाकिटावर कोणत्या प्रकारचे तंत्रज्ञान तसेच कोणत्या क्षेत्रासाठी शिफारस करण्यात आलेली आहे, याचा उल्लेख नसतो. पाकिटावर मालाच्या गुणवत्तेचे विवरण दिलेले नसल्याचे चवाळे यांनी सांगितले.

अशा बियाण्यांची विक्री किंवा साठवणूक केल्यास बियाणे नियंत्रण आदेश १९८३ महाराष्ट्र कापूस बियाणे अधिनियम २००९, नियम २,०१० तसेच पर्यावरण संरक्षण कायदा १,९८६ अंतर्गत कायदेशीर कारवाई केल्या जाणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

बॉक्स

बोलगार्ड-२ मध्ये बीजी-२ ची किंमत ७३० रुपये

कपाशीचे बियाणे खरेदी करताना पक्के बिल घ्यावे, बिलात पिकाचे वाण, लॉट नंबर, वजन, अंतिम मुदत, कंपनीचे पूर्ण नाव नमूद असल्याची खात्री करून घ्यावी. कपाशी बियाणे पाकिटावरील सरकारमान्य चिन्ह तपासून घ्यावे. बियाणे उगवणीची खात्री करण्यासाठी अंतिम मुदत तपासावी. बोलगार्ड-२ मध्ये बीजी-२ च्या पाकिटाची किंमत ७३० रुपये यंदा जाहीर करण्यात आल्याचे कृषी विभागाने सांगितले.

Web Title: Prohibition of cultivation of HTBT seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.