महसूल कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 06:00 AM2020-01-03T06:00:00+5:302020-01-03T06:00:30+5:30
शिधापत्रिका वितरणातील अनियमिततेवर बोट ठेवून संबंधित दोघांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्याचे आदेश ना. बच्चू कडू यांनी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर तहसीलमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संघटनेसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. अधिकाऱ्यांचा लेखी खुलासा ग्राह्य धरण्यात आला नाही.
दर्यापूर : राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पुरवठा निरीक्षक प्रमोद काळे व सपना भोवते यांच्या निलंबनाचे आदेश दिले होते. त्या आदेशाविरुद्ध गुरुवारी दर्यापूर तहसीलमधील महसूल विभागाचे कामकाज ठप्प राहिले. चौकशी न करता कुठल्याही अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश काढू नयेत, अशी मागणी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
शिधापत्रिका वितरणातील अनियमिततेवर बोट ठेवून संबंधित दोघांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्याचे आदेश ना. बच्चू कडू यांनी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर तहसीलमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संघटनेसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. अधिकाऱ्यांचा लेखी खुलासा ग्राह्य धरण्यात आला नाही. तहसीलदार, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई, पाठविलेला निलंबनाचा प्रस्ताव नियमसंगत नाही. लोकसेवा हक्क अधिनियमात सरळ निलंबनाची तरतूद नाही. त्यामुळे काळे व भोवते यांचा निलंबनाचा प्रस्ताव रद्द करावा, अशी विनंती केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष नामदेव मेटांगे, राज्य सहसचिव आशिष ढवळे, अमोल दांडगे यांच्यासह महसूल कर्मचारी उपस्थित होते.