१४ मुख्याध्यापक, ३९ विषय शिक्षकांचे केंद्रप्रमुख पदावर प्रमोशन

By जितेंद्र दखने | Published: July 9, 2024 09:25 PM2024-07-09T21:25:10+5:302024-07-09T21:25:27+5:30

जिल्हा परिषद : २७ जणांनी नाकारली पदोन्नती, १३जण गैरहजर

Promotion of 14 headmasters, 39 subject teachers to the post of center head | १४ मुख्याध्यापक, ३९ विषय शिक्षकांचे केंद्रप्रमुख पदावर प्रमोशन

१४ मुख्याध्यापक, ३९ विषय शिक्षकांचे केंद्रप्रमुख पदावर प्रमोशन

अमरावती: गत अनेक दिवसांपासून रखडलेल्या केंद्रप्रमुख पदासाठीच्या पदोन्नतीची प्रक्रिया मंगळवार, ९ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात समुपदेशन पद्धतीने  पार पडली. ही प्रक्रिया सीईओ संजीता मोहपात्रा यांच्या मार्गदर्शनात प्राथमिक शिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनवने यांच्या उपस्थितीत राबविली. या पदोन्नतीची प्रक्रियेत  केंद्रप्रमुखांच्या ५३ रिक्त पदांवर १४ मुख्याध्याक व ३९ शिक्षकांना पदोन्नती( प्रमोशन)  देण्यात आली. विशेष म्हणजे २७ विषय शिक्षकांनी पदोन्नती नाकारली आहे.तर या प्रक्रियेला १३ जण गैरहजर होते. 

जिल्ह्यात १३९ केंद्र प्रमुखांची पदे मंजुर असुन यापैकी ६९ पदे ही भरती प्रक्रियेने तर ५० पदे पदोन्नतीने भरावयाची होती.यामधील १७ पदे भरली आहेत. ५३ पदासाठी पदोन्नतीचा प्रक्रिया राबविण्यात आली. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने या पदोन्नतीसाठी शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला होता. अखेर याची दखल घेत प्राथमिक शिक्षण विभागाने रखडलेल्या पदोन्नतीचा प्रश्न निकाली काढला. झेडपीच्या सभागृहात सकाळी ११ वाजतापासून पदोन्नतीकरीता प्रशिक्षित पदविधर विषय शिक्षक व मुख्याध्यापक अशा १६६ जणांना बोलाविण्यात आले होते. यामध्ये सर्वसाधारणच्या १६० पैकी ५१ जणांना तर दिव्यांग संवर्गामधून ६ पैकी २ जणांना केंद्रप्रमुख म्हणुन पदोन्नती देण्यात आली आहे.

यामध्ये मात्र २७ शिक्षकांनी पदोन्नती नाकारली. ११ सेवानिवृत्त शिक्षकांची झाल्यामुळे सेवा ज्येष्ठता यादीत ही नावे वगळण्यात आलीत. याशिवाय १३ शिक्षक गैरहजर होते. त्यामुळे यादीतील १०४ क्रमाकापर्यतच्या शिक्षकांना या पदोन्नतीचा लाभ मिळाला. या प्रक्रिये दरम्यान

यावेळी उपशिक्षणाधिकारी गजाला नाजीमा,विस्तार अधिकारी गंगाधर मोहने यांच्यासह प्रवीण जिचकार, पंकज गुल्हाने, संजय खडसे, शरद चहाकार, ऋषीकेश कोकाटे, संजय मुद्रे,राहुल काळमेघ, संदीप बिलबिले, हेमंत यावले, चंद्रशेखर टेकाळे, विजय राऊत, चेतन भगत, श्याम देशमुख,विजय मालोकार, संजय वाघमारे आदींनी प्रशासकीय कारवाईचे कामकाज पाहिले.

अशी भरली तालुकानिहाय पदे
मोर्शी ५, तिवसा ३, चांदूर बाजार ५, चांदूर रेल्वे ३, अमरावती १, नांदगाव खंडेश्वर १, दर्यापूर ३, धामणगाव रेल्वे ३, अंजनगाव सुर्जी ४, चिखलदरा ७, धारणी ९, वरूड ४ आणि अचलपूर ५ याप्रमाणे १३ पंचायत समितीत नवीन केंद्रप्रमुख नियुक्त केले आहेत.

Web Title: Promotion of 14 headmasters, 39 subject teachers to the post of center head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.