घरकुलांसाठी आवश्यक निधीचे प्रस्ताव तातडीने सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:26 AM2021-09-02T04:26:39+5:302021-09-02T04:26:39+5:30

अमरावती : जिल्ह्यातील सर्व शहरांत गरजूंना घरे मिळण्यासाठी शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करतानाच आवास योजनेत घरकुल निर्मितीसाठी आवश्यक निधीचे ...

Promptly submit the required funding proposal for the household | घरकुलांसाठी आवश्यक निधीचे प्रस्ताव तातडीने सादर करा

घरकुलांसाठी आवश्यक निधीचे प्रस्ताव तातडीने सादर करा

Next

अमरावती : जिल्ह्यातील सर्व शहरांत गरजूंना घरे मिळण्यासाठी शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करतानाच आवास योजनेत घरकुल निर्मितीसाठी आवश्यक निधीचे प्रस्ताव तात्काळ द्यावेत. निधीअभावी ही कामे थांबू देऊ नये. आपण स्वतः याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करून निधी मिळवून देऊ, अशी ग्वाही पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले.

नगरविकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले, सार्वजनिक बांधकाम मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, नगरविकास प्रशासन अधिकारी गीता वंजारी आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील विविध शहरातील आवास योजनांमध्ये शासकीय जमिनीवरील २ हजार ५५५ अतिक्रमणे नियमानुकूल करण्यात आली आहेत. नगरपंचायतींच्या क्षेत्रातही हे काम पूर्ण व्हावे. आवास योजनेची कामे पूर्ण होण्यासाठी वेळेत प्रस्ताव, निधीसाठी पाठपुरावा नियमित होणे गरजेचे आहे. याबाबत सर्व नगरपालिका व नगरपंचायतींची बैठक मुंबईत मंत्रालय स्तरावर घेतली जाईल. जिल्हास्तर नगरोत्थान योजनेत नगर परिषदांनी वेळेत प्रस्ताव द्यावेत. अग्निशमन बळकटीकरणात अपेक्षित कामे गतीने पूर्ण करावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. पर्यटन अनुदान, नाविन्यपूर्ण उपक्रम आदी बाबींचाही आढावा त्यांनी घेतला. डेंग्यू नियंत्रणासाठी सर्व शहरांत धूर फवारणी, घरोघरी सर्वेक्षण आदी उपाययोजना राबविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

Web Title: Promptly submit the required funding proposal for the household

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.