सुतळीला गाठी मारून ‘त्यांनी’ दिला कामाचा पुरावा, काम करूनही रखडले दाम्पत्याचे वेतन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2017 03:52 PM2017-09-06T15:52:10+5:302017-09-06T15:52:25+5:30

अठराविश्वे दारिद्र्यात खितपत पडलेल्या आदिवासींवर मध्यस्थ दलालच अन्याय करीत असल्याचा प्रकार तालुक्यातील बामादेही येथील ग्रामसभेत उघडकीस आला.

Proof of giving 'he' by kneeling on twine, paid by the couple, even after working | सुतळीला गाठी मारून ‘त्यांनी’ दिला कामाचा पुरावा, काम करूनही रखडले दाम्पत्याचे वेतन

सुतळीला गाठी मारून ‘त्यांनी’ दिला कामाचा पुरावा, काम करूनही रखडले दाम्पत्याचे वेतन

Next

चिखलदरा (अमरावती), दि. 6 - अठराविश्वे दारिद्र्यात खितपत पडलेल्या आदिवासींवर मध्यस्थ दलालच अन्याय करीत असल्याचा प्रकार तालुक्यातील बामादेही येथील ग्रामसभेत उघडकीस आला. चार महिन्यांपासून मग्रारोहयोच्या कामाचे वेतन अप्राप्त असलेल्या आदिवासीने पती-पत्नीच्या कामाचा पुरावा म्हणून घरातील एका सुतळीला मारलेल्या हजेरीच्या गाठी घेऊन वेतनाची मागणी केली.
 
मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात आजही मोठ्या प्रमाणात शिक्षणाचा अभाव आहे. येथील आदिवासी निरक्षर आहेत. त्यांना लिहिता-वाचता येत नाही. परिणामी सोयीनुसार सरळ पद्धतीचा उपयोग केला जातो. बामादेही ग्रामपंचायतीअंतर्गत येणा-या बागदरी येथील बिरजू लाभलाल उईके आणि त्याची पत्नी कुंदिया बिरजू उईके बागदरीसह परिसरात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत सीसीटी पांदण रस्त्याचे काम केले. मागील चार महिन्यांपासून हे दाम्पत्य काम करीत असतानासुद्धा त्यांचे वेतन न मिळाल्याने त्यांनी ही व्यथा बामादेही येथील ग्रामसभेत मांडली. या दाम्पत्याने किती दिवस काम केले, यावर चांगलाच वाद झाला. अनेक मजुरांचे वेतन न मिळाल्याने ग्रामसभेत प्रश्नांचा भडिमार झाला.

आपण 16 आठवडे सपत्नीक मग्रारोहयोची कामे केल्याचा पुरावा असल्याचे बिरजू उईके या मजुराने ग्रामसभेपुढे सांगितले. बिरजू उईके यांच्याकडे लेखी पुरावा असल्याचा संशय गावक-यांना होता. मात्र, त्याने त्याच्या बांडीसच्या खिशातून काढून ग्रामसभेपुढे सादर केलेला पुरावा पाहून सगळ्यांचे डोळे आश्चर्याने थक्क झाले. तो पुरावा म्हणजे एका सुतळीवर मारलेल्या गाठी होत्या. त्या सुतळीवर एकूण बत्तीस गाठी जवळ-जवळ मारल्या होत्या. अर्थात नवरा बायको दोघांनी काम केल्याचे बिरजूने उघड केले. सरपंच मुन्नी कास्देकर, उपसरपंच मिश्रीलाल झाडखंडे, सदस्य व गावक-यांनी या रोजगार सेवकावर झालेल्या अन्यायाची तक्रारच संबंधित अधिका-यांकडे केली आहे. ते काहीही असले तरी विज्ञान युगात सुतळीचा पुरावा मेळघाटात चर्चेचा विषय ठरला आहे. 

ग्रामसभेत बिरजू उईकेने 16 आठवडे पत्नीसह काम केल्याचा पुरावा म्हणून गाठी मारलेली सुतळी सादर केली. त्याच्यासह इतरही मजुरांचे वेतन न मिळाल्याची तक्रार करण्यात आली आहे. 
- मिश्रीलाल झाडखंडे,
उपसरपंच, बामादेही

Web Title: Proof of giving 'he' by kneeling on twine, paid by the couple, even after working

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.