मालमत्ता लाखोंची, कुलूप शंभराचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:09 AM2021-01-01T04:09:18+5:302021-01-01T04:09:18+5:30

अमरावती : संदीप मानकर शहरात रोज कुठे ना कुठे घरफोडीची घटना घडते. नागरिक घरात लाखोंची मालमत्ता ठेवतात. मात्र सुरक्षा ...

Property worth millions, locks worth hundreds! | मालमत्ता लाखोंची, कुलूप शंभराचे!

मालमत्ता लाखोंची, कुलूप शंभराचे!

Next

अमरावती : संदीप मानकर

शहरात रोज कुठे ना कुठे घरफोडीची घटना घडते. नागरिक घरात लाखोंची मालमत्ता ठेवतात. मात्र सुरक्षा म्हणून दरवाजाला किंवा लॉकरला कुलूप मात्र शंभराचे लावले जाते. नागरिक कुलूप खरेदी करताना काटकसर करतात, त्याकारणाने चोऱ्या करणारे चोर स्वस्त कुलूप सहज फोडतात व लाखो रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने व पैसे तसेच घरातील वस्तू लंपास करीत असल्याची अनेक प्रकरणे पुढे आली आहेत. हजारो नागरिक ५० रुपयांपासून तर दोनशे रुपयापर्यंतच्या कुलूपाला पसंती दर्शवित असल्याचे व अशा कुलूपांची सर्वाधिक विक्री होत असल्याचे इतवारा येथील एका हार्डवेअरचे संचालक प्रवीण कासार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. पॅड लॉक, हे १५० ते २०० रुपयांपर्यंत मिळतात, डिक्स लॉक हे २०० ते ५०० रुपयांपर्यंत विक्री केली जाते. डेड लाॅकची विक्री कमी होते. त्याची किंमत १२०० रुपये अशा प्रकारचे लॉक चोरांना तोडण्यास अवघड होते. मर्चिस लॉक हे ८०० ते २००० रुपयांना मिळते तर शटर लॉक १५० ते ८०० तर डिंमल की लॉक १२०० रुपयापर्यंत विक्री करण्यात येत असल्याची माहिती कुलूप विक्रेता यांनी सांगितले. पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत २०१९ या वर्षात ११ महिन्यांत १५९ घरफोड्यांची नोेंद झाली होती तर यंदा १ जानेवारी ते ३० नोव्हेंबरपर्यंत ११ महिन्यात सर्वाधिक २०४ घरफोड्यांची नोंद झाली आहे. अशाच प्रकारच्या शेकडो घरफोड्या ग्रामीण हद्दीतसुद्धा झाल्या आहेत.

बॉक्स :

शहर हद्दीत यंदा २०४ घरफोड्या

नागरिक महागडे कुलूप न वापरता स्वस्त कुलूप वापरण्यास पसंती दर्शवितात, मात्र चोरांना स्वस्त व कमी दणकट कुलूप तोडणे सोयीचे ठरते. शहर हद्दीत गत ११ महिन्यात २०४ घरफोड्या झाल्या आहेत. तर गतवर्षी १५९ घरफोड्या झाल्या होत्या. यंदा घरफोडीच्या ७६६ तर गतवर्षी ७९६ चोरीच्या घटना नोंदविल्या गेल्या.

मर्चिस लॉक २०००

( सर्वात महाग कुलूप)

पॅड लॉक ४०

(सर्वात स्वस्त कुलूप)

१) दणकट आणि महाग कुलूप १० टक्के

२) कमी दणकट आणि कमी महाग कुलूप ६० टक्के

३) अगदीच कमी दणकट आणि स्वस्त कुलूप १० टक्के

पॅड लॉक ४० टक्के

डिक्स लॉक २० टक्के

डेड लॉक १० टक्के

मर्चिस लॉक १० टक्के

शेटर लॉक २० टक्के

Web Title: Property worth millions, locks worth hundreds!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.