सरपंचपदासाठी ओपन गटातील उमेदवाराचा प्रस्ताव जाणार समितीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:22 AM2021-02-06T04:22:09+5:302021-02-06T04:22:09+5:30
अमरावती : ग्रामपंचायतींच्या पहिल्या सभेत सरपंच पदाकरीता सर्वसाधारण प्रवर्गातून निवडून आलेल्या अनुसूचित जाती, जमाती व नामाप्र्र प्रवर्गातील उमेदवारांनी उमेदवारी ...
अमरावती : ग्रामपंचायतींच्या पहिल्या सभेत सरपंच पदाकरीता सर्वसाधारण प्रवर्गातून निवडून आलेल्या अनुसूचित जाती, जमाती व नामाप्र्र प्रवर्गातील उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यास त्यांचा जात पडताळणीचा प्रस्ताव समितीकडे सादर करण्याचे निर्देश उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली व या सर्व ग्रामपंचायतींमध्ये ४ फेब्रुवारीपर्यंत सरपंचपदाचे आरक्षणाची सोडत काढण्यात येत आहे व काही कालावधीत या ग्रामपंचायतींमध्ये पहिल्या सभेचे आयोजन केल्या जाणार आहे व यामध्ये ज्या प्रवर्गासाठी सरपंचपद राखीव आहे. त्या प्रवर्गातील उमेदवाराला अर्ज करता येईल व उमेदवार उपलब्ध नसल्यास सर्वसाधारण प्रवर्गातून निवडून आलेल्या उमेदवारास देखील उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आह. मात्र, या उमेदवारांना जातीचा दाखल उमेदवारी अर्जासोबत जोडावा लागणार आहे व प्रक्रियेपश्चात त्यांच्या जातपडताळणीचा प्रस्ताव जातपडताळणी समितीकडे सादर करण्याचे निर्देश निवडणूक विभागाने सर्व तहसीलदारांना दिले आहेत.