तीर्थक्षेत्रांच्या कामांचे प्रस्ताव द्या आवश्यक निधी मिळवून देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2021 05:00 AM2021-12-27T05:00:00+5:302021-12-27T05:00:58+5:30

जिल्ह्यातील श्रीक्षेत्र रिद्ध्पूर, श्रीक्षेत्र कपिलेश्वर देवस्थान ऊर्फ महादेव संस्थान (गव्हाणकुंड), श्रीक्षेत्र मुदगलेश्वर भारती महाराज संस्थान (अंबाडा, ता. मोर्शी), श्रीक्षेत्र यशवंत महाराज संस्थान (मुसळखेड, ता. वरूड), मारुती महाराज संस्थान (जहागीरपूर, ता. तिवसा) या तीर्थक्षेत्रस्थळी आवश्यक कामांचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. त्या म्हणाल्या, आवश्यक कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. 

Proposal for pilgrimage works and get necessary funds | तीर्थक्षेत्रांच्या कामांचे प्रस्ताव द्या आवश्यक निधी मिळवून देऊ

तीर्थक्षेत्रांच्या कामांचे प्रस्ताव द्या आवश्यक निधी मिळवून देऊ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तीर्थक्षेत्र व महत्त्वाच्या स्थळांचे स्वतंत्र विकास आराखडे तयार करून विविध सुविधांच्या उभारणीतून पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील महत्त्वाच्या तीर्थस्थळी आवश्यक कामांचे परिपूर्ण प्रस्ताव शासनाला सादर करावेत. या कामांसाठी आवश्यक निधी मिळवून देऊ, अशी ग्वाही पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी येथे दिली.
जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र विकासाबाबत आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झूम प्रणालीद्वारे घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. महसूल, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील श्रीक्षेत्र रिद्ध्पूर, श्रीक्षेत्र कपिलेश्वर देवस्थान ऊर्फ महादेव संस्थान (गव्हाणकुंड), श्रीक्षेत्र मुदगलेश्वर भारती महाराज संस्थान (अंबाडा, ता. मोर्शी), श्रीक्षेत्र यशवंत महाराज संस्थान (मुसळखेड, ता. वरूड), मारुती महाराज संस्थान (जहागीरपूर, ता. तिवसा) या तीर्थक्षेत्रस्थळी आवश्यक कामांचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. त्या म्हणाल्या, आवश्यक कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. 
तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी व कौंडण्यपूर विकास आराखड्यात अनेक महत्त्वपूर्ण कामे व सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. अनेक कामांची पूर्तताही झाली आहे. त्याचप्रमाणे इतर तीर्थक्षेत्र स्थळांवरही विविध सुविधांची उभारणी करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार आवश्यक प्रस्ताव द्यावेत. विहित मुदतीत ही कामे पूर्णत्वास जाणे आवश्यक आहे. त्यानुसार गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री ठाकूर यांनी दिले.

Web Title: Proposal for pilgrimage works and get necessary funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.