पडताळणीत अडकले सोयाबीन अनुदानाचे प्रस्ताव

By admin | Published: May 16, 2017 12:06 AM2017-05-16T00:06:40+5:302017-05-16T00:06:40+5:30

जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये आॅक्टोबर ते डिसेंबर २०१६ या कालावधीत हमीपेक्षा कमी भावाने विकल्या गेलेल्या सोयाबीनला शासन अनुदान देणार आहे.

Proposal for soybean subsidy stuck in the verification | पडताळणीत अडकले सोयाबीन अनुदानाचे प्रस्ताव

पडताळणीत अडकले सोयाबीन अनुदानाचे प्रस्ताव

Next

शेतकऱ्यांना मदत : अमरावती बाजार समितीमुळेच विलंब
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये आॅक्टोबर ते डिसेंबर २०१६ या कालावधीत हमीपेक्षा कमी भावाने विकल्या गेलेल्या सोयाबीनला शासन अनुदान देणार आहे. याविषयी अमरावती व्यतिरिक्त सर्व बाजार समित्यांचे अहवाल तयार आहेत. केवळ अमरावती बाजार समितीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे करोडो रूपयांचे अनुदान जिल्ह्यास प्राप्त झालेले नाही.
शासनाने नमूद केलेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत विक्री झालेल्या सोयाबीनला प्रति क्विंटल २०० रूपये व २५ क्विंटल क्षेत्र मर्यादेत अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी शासनदेशानुसार १२ बाजार समित्यांमध्ये ४५ हजार प्रस्ताव प्राप्त झाले होते. या प्रस्तावाची शासनाचे निकषानुसार पडताळणी करण्यात आली.
यामध्ये जिल्ह्यातील अमरावती व्यतिरिक्त सर्व बाजार समित्यांचे अहवाल जिल्हा उपनिबंधक कार्यालयास प्राप्त झाले आहे. केवळ अमरावती बाजार समितीचे प्रस्ताव प्राप्त नसल्याने जिल्ह्यासाठी पणन संचालकांकडून अनुदानाचे करोडो रूपये अडकून पडले आहेत.
जिल्ह्यात या अनुदानासाठी अमरावती बाजार समिती वगळता १५ हजार ५१८ शेतकरी लाभार्थी आहेत. यामध्ये नांदगाव बाजार समितीत २८७०, चांदूररेल्वे १३०३, धामणगाव २५०३, तिवसा २७३, चांदूरबाजार १६७०, मोर्शी १२४५, वरूड ३७, दर्यापूर १३४२, अंजनगाव सुर्जी १७६५, अचलपूर १८४७ व धारणी येथील केंद्रावर ६६३ शेतकरी लाभार्थी आहेत. केवळ अमरावतीचे प्रस्तावांची पडताळणी झाली नसल्याने जिल्ह्याचे अनुदान रखडले आहे.

पात्र शेतकऱ्यांचे २.२५ लाख क्विंटल सोयाबीन
सोयाबीन अनुदानासाठी अमरावती वगळता जिल्ह्यातील ११ बाजार समितीमधील १५ हजार ५१८ शेतकऱ्यांचे २,२४,८२९.२९ क्विंटल सोयाबीन शासन अनुदानासाठी पात्र आहे. यामध्ये नांदगाव खंडेश्वर ३१०५४.३०, चांदूररेल्वे १६१०३.३०, धामणगाव ५१२६४.४०, तिवसा ३३८२.१५, चांदूरबाजार २२७३९.३०, मोर्शी १४२४६.६०, वरूड ४५७.५४, दर्यापूर २०१०९.५०, अंजनगाव सुर्जी २५०७१.७०, अचलपूर २७९३९.८० व धारणी येथील १२४६०.७० क्विंटल सोयाबीन अनुदानासाठी पात्र आहे.

अमरावती बाजार समितीला पत्र देण्यात आले आहे. तेथील प्रस्तावांची युद्धस्तर पडताळणी सुरू आहे. एक-दोन दिवसात पडताळणी पूर्ण होईल. जिल्ह्यास अद्याप अनुदान अप्राप्त आहे.
- गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था

जिल्ह्यात सर्वाधिक प्रस्ताव असल्याने पडताळणीस थोडा विलंब आहे. सोमवार सायंकाळ पर्यंत ही प्रक्रिया होऊन जाईल व सहकार विभागाला सादर करण्यात येईल.
- भूजंगराव डोईफोडे, सचिव, अमरावती बाजार समिती

Web Title: Proposal for soybean subsidy stuck in the verification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.