भोगवटदार वर्ग बदलासाठी मागविले प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:21 AM2021-02-18T04:21:27+5:302021-02-18T04:21:27+5:30
दर्यापूर : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अन्वये वाटप झालेल्या वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ मध्ये रूपांतरण करण्यासाठी शासनातर्फे कार्यक्रम ...
दर्यापूर : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अन्वये वाटप झालेल्या वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ मध्ये रूपांतरण करण्यासाठी शासनातर्फे कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ज्या भोगवटदार जमीन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अन्वये कृषी, निवासी, वाणिज्य किंवा औद्योगिक प्रयोजनार्थ वाटप झालेल्या आहेत व महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक ८ मार्च २०१९ अन्वये वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये रूपांतरण करण्यास पात्र आहेत, त्यांच्यासाठी अधिसूचनेत देय रूपांतरण अधिमूल्य शासनाला अदा करावे लागेल. अशा सर्वांकरिता अर्जाचा नमुना तहसील कार्यालयात उपलब्ध आहे. इच्छुकांना योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार योगेश देशमुख यांनी केले आहे.
दरम्यान, भोगवटदार रूपांतरणाचा हा नियम कूळ, वतन व इनाम कायदा सिलिंग कायद्यानुसार प्रदान केलेल्या जमिनींना लागू होणार नाही, असे तहसीलदारांनी स्पष्ट केले.