सायंसस्कोरमध्ये सीबीएसर्र्ई अभ्यासक्रमाचा प्रस्ताव

By admin | Published: April 15, 2015 12:14 AM2015-04-15T00:14:52+5:302015-04-15T00:14:52+5:30

खासगी शाळेच्या तोडीस तोड देण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण समितीने प्रायोगिक तत्त्वावर सायन्सस्कोअर व गर्ल्स..

Propose CBSE course in ScienceScore | सायंसस्कोरमध्ये सीबीएसर्र्ई अभ्यासक्रमाचा प्रस्ताव

सायंसस्कोरमध्ये सीबीएसर्र्ई अभ्यासक्रमाचा प्रस्ताव

Next

हालचाली सुरू : जिल्हा परिषद शिक्षण समितीचा निर्णय
अमरावती : खासगी शाळेच्या तोडीस तोड देण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण समितीने प्रायोगिक तत्त्वावर सायन्सस्कोअर व गर्ल्स शाळेत नर्सरी ते इयत्ता दहावीपर्यंत सीबीएसई अभ्यासक्रम सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे.
सध्या शहरासह ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा अधिक कल वाढला आहे. त्यामुळे खासगी व शासकीय शाळांमध्ये याचा परीणाम दिसून येत आहे. अशातच जिल्हापरिषद शाळांमध्ये शैक्षणीक गुणवत्ता ढासळत चालल्याने या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्यासुध्दा रोडावलेली आहे. अशा परिस्थितीत खासगी शाळांत सीबीएसई, आयसीएसई अशा अभ्याक्रमांकडे पालकांचा जास्त कल आहे. हे शिक्षण महागडे असले तरी पाल्यांच्या शिक्षणाचा पाया सुरूवातीपासूनच मजबूत असावा अशी भूमिका बहुतांश पालकांची असते. त्यामुळे आता जिल्हा परिषदेनेसुध्दा खासगी शाळेच्या तोडीला तोड देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सायन्सस्कोर शाळेत असलेल्या मराठी, हिंदी, व उर्दू माध्यमांचे सध्या सुरू असलेल्या तुकड्या कायम ठेवत याच शाळेत सीबीएसई पॅटर्ननुसार नर्सरी ते इयत्ता दहावीपर्यंत विनाअनुदानित तत्त्वावर नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय शिक्षण समितीने घेतला आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने तयारीही सुरू केली आहे. यासाठी प्राथमिक चर्चा झाली असून यासाठी आवश्यक तांत्रिक बाबी तपासून पाहिल्या जात आहेत.
गरीब मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी जिल्हा परिषदेच्या सायन्सस्कोअर शाळेत मुले आणि मुली तर गर्ल्स हायस्कुल शाळेत फक्त मुलींकरीता सीबिएसई पॅटर्न सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेत या दृष्टीने आवश्यक कारवाई सुरू केली आहे. मात्र जिल्हा परिषद ही ग्रामीण भागाशी संबंधित आहे. यामध्ये काही तांत्रिक अडचणी येत असल्याने यावर मार्ग काढत नवीन विनाअनुदानित सीबीएसई पॅटर्न सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार करून हा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. शासनाने याला मंजुरी दिल्यास खासगी शाळांप्रमाणेच जिल्हा परिषद शाळेत सीबीएसई पॅटर्न सुरू होणार आहे.

याप्रमाणे असतील तुकड्या
सायन्सस्कोर शाळेत विनाअनुदानित तत्त्वावर प्रस्तावित असलेल्या सीबीएससी पॅटर्नमध्ये के.जी.१ मध्ये साडेतीन वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. के.जी. २ मध्ये साडेचार ते साडेपाच वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. इयत्ता पहिलीमध्ये ५ वर्षांवरील विद्यार्थ्याना प्रवेश दिला जाईल. इयत्ता दुसरी ते दहावीपर्यंतच्या निकषाप्रमाणे वर्ग तुकडीत समावेश असणार आहे.

असा असेल अभ्यासक्रम
जिल्हा परिषद शिक्षण विभागाने प्रस्तावित केलेल्या सिबीएसई पॅटर्नमध्ये केंद्रीय बोर्डाने ठरवून दिलेला सर्व समावेशक असलेला पूर्ण अभ्याक्रम इंग्रजीमध्येच असेल. प्रशिक्षित तज्ज्ञ शिक्षकांची कंत्राटी तत्त्वावर ११ महिन्यांच्या करारावर निवड केली जाईल.

Web Title: Propose CBSE course in ScienceScore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.