सहकारातून समृद्धी, नेरपिंगळाईत ७० वर्षांची साधना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 10:59 PM2017-12-10T22:59:10+5:302017-12-10T23:00:40+5:30

गावाच्या विकासात लोकांनी एकत्र यावे, शेतकºयांनीही सक्षम व्हावे, नवे तंत्रज्ञानातून शेतीच्या विकासाचा मार्ग विस्तारण्याचा अनोखा प्रयोग अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथे यशस्वी झाला आहे.

Prosperity in cooperation, 70 years of spiritual practice in Nerpingalei | सहकारातून समृद्धी, नेरपिंगळाईत ७० वर्षांची साधना

सहकारातून समृद्धी, नेरपिंगळाईत ७० वर्षांची साधना

googlenewsNext
ठळक मुद्देसहकार भूषण : शेतकऱ्यांसह नागरिकांच्या गरजा भागविणारी संस्था, राज्यात ठरली अव्वल

आॅनलाईन लोकमत
नेरपिंगळाई : गावाच्या विकासात लोकांनी एकत्र यावे, शेतकऱ्यांनीही सक्षम व्हावे, नवे तंत्रज्ञानातून शेतीच्या विकासाचा मार्ग विस्तारण्याचा अनोखा प्रयोग अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथे यशस्वी झाला आहे. येथील सेवा सहकारी सोयायटीने ७३ वर्षांत ‘सहकारातून समृद्धीकडे’ वाटचाल करून राज्यात नाव कमविले आहे. ही संस्था अमरावती जिल्ह्यासाठी भूषण ठरली.
नेरपिंगळाईच्या या संस्थेची स्थापना १८ जुलै १९४४ रोजी गावकऱ्यांनी ‘नेरपिंगळाई क्रॉप लोन सोसायटी’ या नावाने केली. त्यावेळी या संस्थेमार्फत केवळ पीककर्ज देण्यात येत होते. १९५७ मध्ये संस्थेचे विविध कार्यकारी सहकारी संस्थेमध्ये रूपांतर झाले. शेतकऱ्यांना शेतीच्या गरजा पुरविणारी दुकाने काढण्यात आली. या दुकानांमधून सभासदांना कमी दरात उत्कृष्ट वस्तूंचा पुरवठा केला जातो. संस्था स्वनिधीवर व्यवसाय करीत आहे. नफ्यात असलेल्या या संस्थेचा अंकेक्षणाचा अ दर्जा बहाल करण्यात आला आहे.
संस्थेचे आज रोजी १८३४ सभासद आहेत. संस्थेकडे पीक कर्जाशिवाय कोणतेही कर्ज नाही. संस्था दरवर्षी नफ्यात असून सभासदांना दरवर्षी १५ टक्के लाभांश देत आहे. संस्थेजवळ ३ कोटी ९४ लाखाहून अधिक रूपयांच्या ठेवी तर गुंतवणुकीचा आकडा ३ कोटी ४५ लाखांच्या घरात आहे.
दोनदा मिळाला ‘सहकार भूषण’ पुरस्कार
संस्थेने स्थापनेपासून तो आतापावेतो केलेल्या उत्कृष्ट कामकाजाची पावती म्हणून संस्थेला सन २०१२ मध्ये महाराष्टÑ शासनाचा सहकार भूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर २०१६ मध्ये पुन्हा महाराष्टÑ शासनाचा सहकार भूषण हा देण्यात आला आहे. राज्यात नामवंत व कार्यशिल म्हणून या संस्थेचा गौरव केला जातो.
नागरिकांसाठी सहकारी दुकाने
सोसायटीने गावात स्वस्त धान्य दुकाने, कृषी सेवा केंद्र, बचत व मुदती ठेव व्यवसाय, वेअर हाऊस, शेतमाल तारण व्यवसाय, हार्डवेअर दुकाने, कापड भांडार, किरकोळ तसेच घाऊक घासलेट व्यवसाय, सोने तारण व्यवसाय, लॉकर सुविधा आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. परिसरातील राजूरवाडी, लेहगाव, धामणगाव (काटपूर), अडगाव या गावात संस्थेने दुकानांच्या शाखा सुरू केल्या आहेत.

सर्व संचालकांचे सहकार्य व सभासदांचा दृढ विश्वास यामुळे संस्था प्रगतीपथावर कार्य करीत आहे. ही परंपरा आम्ही कायम ठेवाण्याचा पूर्ण प्रयत्न करू.
- संजय मंगळे,
अध्यक्ष, सेवा सहकारी सोसायटी नेरपिंगळाई

Web Title: Prosperity in cooperation, 70 years of spiritual practice in Nerpingalei

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.