प्रहारक्षाकडुन रासायनिक खताच्या दरवाढीचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:14 AM2021-05-21T04:14:54+5:302021-05-21T04:14:54+5:30
येवदा : खरीप हंगामाच्या तोंडावर केंद्र सरकारने रासायनिक मिश्र खताच्या किमतीच्या दरात मोठ्या प्रमाणात दरवाढ केली आहे. प्रहार ...
येवदा : खरीप हंगामाच्या तोंडावर केंद्र सरकारने रासायनिक मिश्र खताच्या किमतीच्या दरात मोठ्या प्रमाणात दरवाढ केली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने या दरवाढीचा तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला. तसेच ही दरवाढ रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करू. असाही इशारा देण्यात आला.
पूर्वी ११८५ रुपयांना मिळणारी डिएपी चि गोणी आता १९०० रुपयात मिळणार आहे. १०.२६.२६ची ५० किलोच्या गोणीची किमत ११७५ रुपयांवरून १७७५ रुपयांवर पोहोचली आहे. या दरवाढीचा जाहीर निषेध करण्यात आला. निवेदन देते वेळी आकाश घटाळे, कुणाल नगे, हर्षद डालके, ऋषिकेश इंगळे, गोपाल नवलकार, मंगेश पांडे, असलम सय्यद, शुभम बघेले, किशन बघेले, अमोल कराळे उपस्थित होते.