महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हा कचेरीवर धरणे; विविध मागण्या प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2024 06:41 PM2024-03-09T18:41:23+5:302024-03-09T18:41:40+5:30
कालबद्ध आंदोलन, संघटना आक्रमक
अमरावती : शासन निर्णयानुसार सर्वसाधारण बदल्या, पदोन्नती व कालबद्ध पदोन्नतीची प्रकरणे निकाली काढण्यासोबतच अव्वल कारकून (आस्थापना) ब्रिजेश वस्तानी यांच्या बदलीच्या मागणीसाठी अमरावती जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेद्वारा शनिवारी जिल्हा कचेरीवर धरणे आंदोलन करण्यात आले.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव गडलिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आंदोलनात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना अमरावतीचे सरचिटणीस डी. एस. पवार, मागासवर्गीय अधिकारी-कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष विजयकुमार चोरपगार यांनी धरणे आंदोलनात उपस्थित राहून समर्थन दिले. याशिवाय महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना, मुंबई यांनीदेखील समर्थन दिले आहे.
आंदोलनात संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष श्याम मिश्रा यांनी संचालन, राज्य सहसचिव गजानन खडसे यांनी प्रास्ताविक व सरचिटणीस संतोष गायकवाड यांनी आभार व्यक्त केले.
आंदोलनात जीवन देशमुख, के. एच. रघुवंशी, कैलास गुळसुंदरे, आशिष ढवळे, प्रीतेश देशमुख, तुषार निंबेकर, नीलेश गाढे, राहुल बोबडे, अमोल दांडगे, विनोद जाधव, शिवदास चव्हाण, सुशील काशीकर, श्रीकृष्ण तायडे, भास्कर रिठे, के. टी. गावंडे, विश्वास दंदे, हिंमतराव भिंगारे, अनिल मानकर, सुरेश शिर्के, आर. एस. राऊत, सुरेश डवाले, विनोद भगत, अब्दुल वजीद आदी कर्मचारी उपस्थित होते. संघटनेद्वारा १६ मार्चला घंटानाद, २३ला एकदिवसीय उपोषण व ३० मार्चपासून आमरण उपोषण करण्यात येणार आहे.