वणी येथे केंद्र शासनाविरुद्ध काळे झेंडे दाखवून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:12 AM2021-05-27T04:12:50+5:302021-05-27T04:12:50+5:30
चांदूर बाजार : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाले आहेत. मात्र, केंद्र सरकारने लागू केलेले ...
चांदूर बाजार : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाले आहेत. मात्र, केंद्र सरकारने लागू केलेले तीनही कायदे अजून रद्द केले नाहीत. याचा निषेध करीत प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केंद्र शासनाच्या विरोधात काळे झेंडे दाखविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार वणी येथील शेतकऱ्यांनी घरोघरी तसेच चौकाचौकांत काळे झेंडे दाखवित केंद्र शासनाचा निषेध केला. प्रहार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश देशमुख, सुरेश खैरकार, सुनील मोहोड, वसंत नवघरे, प्रतीक नवघरे, अतुल शेळके, राजेंद्र काळे, अतुल राऊत, राजेंद्र नवघरे, मयूर देशमुख, सतीश धनसांडे, योगेश पाथरे, गौरव राऊत, विकी राऊत, अतुल शेळके, देवेंद्र शेळके , प्रफुल्ल सोलाव, रामेश्वर नवघरे, निखिल शेळके, राम घोम यांच्यासह ७५ वर्षीय वृद्धा राजकन्या शेळके, गुंफाबाई धनसांडे, कुसुम नवघरे तसेच मोठ्या संख्येने नागरिकांनी घरोघरीच काळे झेंडे उभारले होते.