शहरातील रुग्णालयांना २५ कॉन्सन्ट्रेटर प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:10 AM2021-06-03T04:10:34+5:302021-06-03T04:10:34+5:30

पान ३ हाकेला धावला दुबईचा मित्र, पीडीएमसी, अच्युत महाराज, डॉ. हेडगेवार, दयासागर रुग्णालयांसह बडनेराला मदत अमरावती : दुबई व ...

Provide 25 concentrators to hospitals in the city | शहरातील रुग्णालयांना २५ कॉन्सन्ट्रेटर प्रदान

शहरातील रुग्णालयांना २५ कॉन्सन्ट्रेटर प्रदान

Next

पान ३

हाकेला धावला दुबईचा मित्र, पीडीएमसी, अच्युत महाराज, डॉ. हेडगेवार, दयासागर रुग्णालयांसह बडनेराला मदत

अमरावती : दुबई व भारतात विविध ठिकाणी उभारलेल्या ६५ रुग्णालयांतून श्रमजिवी वर्गाला वैद्यकीय सेवा पुरविणारे डॉ. संजय पैठणकर यांनी शहरातील रुग्णालयांना २५ कॉन्सन्ट्रेटर प्रदान केले. यामुळे पीडीएमसी, अच्युत महाराज, डॉ. हेडगेवार, दयासागर रुग्णालयांसह बडनेरा शहरातील कोरोनाग्रस्तांना या आजाराशी लढण्यास मदत होणार आहे.

डॉ. संजय पैठणकर हे डॉ. सोनाली देशमुख यांचे वर्गमित्र आणि त्यांचे पती व माजी आमदार डॉ. सुनील देशमुख यांचे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या काळापासून मित्र आहेत. त्यांच्या हाकेला प्रतिसाद देऊन त्यांनी हे कार्य केले. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते दुबई येथे स्थिरावले. संपूर्ण आशिया खंडातून आलेला श्रमजिवी व मध्यम वर्गाला तेथे त्यांचा मोठा आधार आहे. डॉ. संजय पैठणकर यांच्या विदर्भाविषयीच्या आत्यंतिक प्रेमातून ना. नितीन गडकरी यांच्या आवाहनावरून त्यांनी आपल्या मित्रमंडळींच्या माध्यमातून नागपूरला ६५० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि ६०० ऑक्सिजन सिलिंडर पाठवले. या संपूर्ण सामग्रीची किंमत किमान दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. यापैकी १५० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि तेवढ्याच ऑक्सिजन सिलिंडर्सचा भार स्वतः डॉ. पैठणकर यांनी उचलला आहे.

डॉ. सुनील देशमुख यांनी विनंती केल्यानंतर डॉ. पैठणकर यांनी २५ ऑक्सिजन सिलिंडर अमरावतीला पाठवले. २५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरमुळे अमरावतीतील अनेक रुग्णांना भरीव मदत होणार आहे. त्यांचे डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल, डॉ. हेडगेवार हॉस्पिटल, दयासागर हॉस्पिटल आणि बडनेरा शहरात लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, कौशिक अग्रवाल, श्याम जोशी, अभय बपोरीकर, योगेश निमकर प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Provide 25 concentrators to hospitals in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.