तूर दवाळबाधित, हेक्टरी ५० हजारांची भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 01:32 AM2018-01-05T01:32:40+5:302018-01-05T01:32:54+5:30

Provide 50 thousand rupees for hectare damaged area | तूर दवाळबाधित, हेक्टरी ५० हजारांची भरपाई द्या

तूर दवाळबाधित, हेक्टरी ५० हजारांची भरपाई द्या

Next
ठळक मुद्देबबलू देशमुख : तत्काळ सर्वेक्षण करा, अन्यथा रस्त्यावर उतरू

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अपुऱ्यां पावसाने यंदाचा खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. कपाशीचे पीक हातचे गेले आता तुरीवरदेखील दवाळचे संकट ओढावले आहे. शेतकरी आर्थिक संकटात आहे, त्यामुळे शासनाने तुरीच्या सर्वेक्षणाचे तत्काळ आदेश देऊन हेक्टरी ५० हजारांची भरपाई द्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून जाब विचारू, असा इशारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी शासनाला दिला.
सलग दुष्काळ, शेतमालास हमीभाव नाही, सरसकट कर्जमाफी नाही आदी कारणांमुळे आज जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात आहेत. कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढावे, यासाठी कोणताही धोरणात्मक निर्णय शासनाने घेतला नाही. शेतकºयांसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरल्यानेच शासनाला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला, मात्र, यामध्येही सरसकट कर्जमाफी न करता शासनाने शेतकऱ्यांची फसवणूककेलेली आहे. आता सहा महिने होऊन गेले असतानाही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ अद्याप मिळालेला नाही. कपाशीचे पीक बोंडअळीने उद्ध्वस्त झाले, यासाठी शासन मदत देण्याची घोषणादेखील संपूर्ण फसवी ठरली आहे. अपुºया पावसाळ्यामुळे तुरीच्या उत्पादनात आधीच कमी येत असताना थंडीमुळे दवाळबाधित होऊन शेतातील उभी तूर जाग्यावरच सुकत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शासनाने तत्काळ सर्वेक्षणाचे आदेश देऊन तूर उत्पादकाला हेक्टरी ५० हजारांची सरसकट मदत करावी, अशी मागणी बबलू देशमुख यांनी पत्रकाद्वारे केली.
शासन दगाबाज, वर्षभरानंतरही शेतकऱ्यांना मदत नाही
मागील वर्षी बेभाव विकल्या गेलेल्या सोयाबीनचे अनुदान अद्यापही शेतकऱ्यांना मिळाले नाही. गेल्या वर्षी अतिथंडीमुळे जिल्ह्यातील २५ हजार हेक्टरमधील तुरीवर दवाळ गेल्याने जाग्यावरच सुकली. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वेक्षणाचे आदेश दिलेत. मात्र, यंदाचा हंगाम संपत आला असतानाही शासनाने नैसर्गिक आपत्तीची मदत दिलेली नाही. त्यामुळे हे शासनच शेतकऱ्यांसाठी दगाबाज ठरत आहे. त्यांना शेतकºयांना मदतीसाठी केलेल्या घोषणांची आठवण करून देऊ, यासाठी आक्रमक होऊन रस्त्यावर उतरू व या सरकारला त्यांच्या घोषणांची आठवण करून देत शेतकऱ्यांना न्याय देऊ, असे बबलू देशमुख यांनी सांगीतले.

Web Title: Provide 50 thousand rupees for hectare damaged area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.