बलई समाजाला सुविधा मिळवून देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:06 AM2018-01-10T00:06:39+5:302018-01-10T00:07:10+5:30
पहिल्यांदाच एकत्र आलेल्या बलई समाजाने एकतेचे दर्शन घडवून दिले आहे.
आॅनलाईन लोकमत
परतवाडा : पहिल्यांदाच एकत्र आलेल्या बलई समाजाने एकतेचे दर्शन घडवून दिले आहे. या समाजाला जात प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश व मेळघाटातील आदिवासींना सर्व सुविधा मिळवून देण्यासाठी जोमदार प्रयत्न करू, असे आश्वासन आ. रवी राणा यांनी केले.
महाराष्ट्र प्रदेश बलई समाज विकास परिषद व अमरावती जिल्हा युवक-युवती परिचय व बलई समाजाचे संमेलन परतवाडा येथे आयोजित करण्यात आले होते. निवडून आल्यावर वर्षभर तोंड न दाखविणारे आहेत. त्यांना लोकांनी नाइलाजाने निवडून दिल्याचा टोला, खा आनंदराव अडसूळ यांचे प्रत्यक्ष नाव घेता, आ. राणा यांनी लगावला. कार्यक्रमाचे उद्घाटन अ.भा. बलई समाज महासंघ सचिव यशवंत मालवीय यांनी केले. प्रदेशाध्यक्ष मिश्रीलाल झाडखंडे अध्यक्षस्थानी होते. माजी आमदार केवलराम काळे, प्रदेश सचिव रवि आठोले, प्रदेश संघटक दिनेश बचले, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पंडोले, सभापती कविता काळे. रमेश बेलकर, दयाराम काळे, महेंद्र गैलवार, पूजा येवले, राहुल येवले, पद्मलाल बेले, रूपलाल बिसोने, तालुकाध्यक्ष अचलपूर सुशील बेलकर, धारणी विजय नांदूरकर, चिखलदरा आनंद आठोले, संजय बेलकर, सहदेव बेलकर, राजेश सेमलकर, देविदास कोगे, चंद्रसेन नांदूरकर, जीवन पंडोले, बब्बू अजनेरिया, प्रभुदास बिसंदरे, राजेश गाठे, प्रवीण आठोले, छगनलाल मोरले, हरिकिशोर आठोले, दिलीप गाठे, सदानंद आठोले, रामप्रसाद बेलकर, दुर्गा बिसंदरे, गीता आठोले, चंद्रकला आठोले, दीपक नागले, दीपक पंडोले, परशराम गाठे, मनोज बेलकर, बसंता वाघमारे, कृष्णा सतवासे, कैलाश घुमावरे, संजय हरसुले, कृष्णा बचले, रामोद मोरले, दीपेश बेलकर, वासुदेव बघाये, सुंदरलाल झाडकर, राधे करले, खेमराज अथोटे आदी उपस्थित होते.