विदर्भातील पंढरपूर पायी दिंडी मार्गावर सुविधा द्या!
By admin | Published: November 10, 2016 12:14 AM2016-11-10T00:14:30+5:302016-11-10T00:14:30+5:30
आषाढी एकादश्ीचया पर्वावर विदर्भ व मराठवाड्यातील वेगवेगळ्या मार्गाने श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पायी दिंडी...
यशोमती ठाकूर यांची मागणी : ग्रामविकास मंत्र्यांना निवेदन
अमरावती : आषाढी एकादश्ीचया पर्वावर विदर्भ व मराठवाड्यातील वेगवेगळ्या मार्गाने श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पायी दिंडी मार्गावर सोयीसुविधा पुरविण्यासाठी शासनााकडून निधी उपलब्ध करून देण्यात यावा व यासाठी स्वतंत्र समिती गठित करण्यात यावी, अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केली आहे.
श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दरवर्षी आषाढी एकादश्ीाच्या पर्वावर संपूर्ण राज्यातून वेगवेगळ्या मार्गाने पायी दिंडी जातात. या दिंडी मार्गावर तात्पुरत्या सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी शासनाकडून निधी देण्यात येतो. मात्र, राज्यातील पुणे, सातारा व सोलापूर या तीनच जिल्ह्यांना आजवर हा निधी उपलब्ध करून देण्यात आला. विशेष म्हणजे विदर्भ व मराठावाडा भागातील श्रीक्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या पायी दिंडीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हा मुद्दा आ. यशोमती ठाकूर यांनी ग्रामविकास मंत्र्यांच्या दालनात उपस्थित करून तिवसा विधानसभा मतदारसंघातील श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील रुख्मिणी मातेच्या पालखीचाही यात समावेश आहे. विशेष म्हणजे ही दिंडी सन १५९४ पासून महाराष्ट्रातून सर्व प्रथम जाणारी असून प्रथम पालखीचा मानही या दिंडीला असल्याची बाबही त्यांनी ना. मुंडेच्या निदर्शनास आणून दिली.
यावेळी चर्चा करताना शासनाकडून राज्यातील केवळ तीनच जिल्ह्यांना हा निधी आजवर देण्यात आला. मात्र, विदर्भ व मराठवाड्यातील दिंडी मार्गावर सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी निधी मिळत नाही, याचा अर्थ काय? असा रोखठोक सवालही आ. यशोमती ठाकुरांनी उपस्थित केला. त्यावेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी हा महत्वाचा विषय असून याबाबत लवकरच मंत्रालय स्तरावर आढावा बैठक आयोजित करून यासाठी स्वतंत्र समिती गठित करण्याच्या दृष्टिने निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. आता आषाढी वारीच्या पायी दिंडी मार्गावर वारकऱ्यांचा पंढरपूर प्रवास सुखदायक होणार आहे. (प्रतिनिधी)