बाधित पिकांचे पंचनामे करून आर्थिक मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:11 AM2021-07-20T04:11:23+5:302021-07-20T04:11:23+5:30
अमरावती : जिल्ह्यात रविवारी अतिवृष्टीमुळे पिके खरडली गेली, घरांची पडझड झाली. याचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत ...
अमरावती : जिल्ह्यात रविवारी अतिवृष्टीमुळे पिके खरडली गेली, घरांची पडझड झाली. याचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी, युवा स्वाभिमान पक्षाद्वारे सोमवारी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. जिल्ह्यात रविवारी अतिवृष्टीमुळे शेतांमध्ये पाणी साचले, गावागावात पाणी घुसले, अनेक घरांचे नुकसान झाले, शेतातील पिके खरडली गेली किंवा वाहून गेली, अशा गावांतील नुकसानीचा तात्काळ पंचनामा करून सदर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, विनोद जायलवाल, जि.प. सदस्य दिनेश टेकाम, मयुरी कावरे, उमेश डकरे, आशिष कावरे, रश्मी घुले, प्रदीप थोरात, राजू रोडगे, उमेश ढोणे, उपेन बचले, मंगेश इंगोले, देवानंद राठोड, पद्माकर गुल्हाने, अमोल कोरडे, अवी काळे, अजय देशमुख, धीरज केने, पवन बैस, दुर्योधन जावरकर, बंटी केजरीवाल, रवी गवई, प्रदीप अनिल तिडके, शंकर डोंगरे, विठ्ठल ढोले, अजय बोबडे आदी उपस्थित होते.