व्यावसायिक, शेतकरी, शेतमजुरांना आर्थिक मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:11 AM2021-05-29T04:11:08+5:302021-05-29T04:11:08+5:30
अ. भा. भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे तहसिलदारांना निवेदन अ. भा. भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती: तहसिलदारांना निवेदन फोटो पी ...
अ. भा. भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे तहसिलदारांना निवेदन
अ. भा. भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती: तहसिलदारांना निवेदन
फोटो पी २८ खांडपासोळे
चांदूर रेल्वे : लॉकडाऊन काळात व्यावसायिक, शेतकरी, शेतमजुरांना आर्थिक मदत द्या, अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष राजेश खांडपासोळे यांनी केली. या मागणीचे निवेदन त्यांनी तहसीलदारांना दिले आहे.
काही व्यावसायिकांकडे सरकारी, खासगी बँकांचे हप्ते भरण्यासाठीसुद्धा जवळ पैसे नाहीत. त्यामुळे त्यांना मार्च ते मे या तीन महिन्यांचे दरमहा पाच हजार रुपये आर्थिक अनुदान देण्यात यावे तसेच मागील तीन महिन्यांचे सरसकट वीज बिल माफ करण्यात यावे. मोफत बी-बियाणे देण्यात यावे व खतांवरील दरवाढ कमी करण्यासाठी संबंधित विभागाला तत्काळ सूचना देण्यात याव्यात. कष्टकरी मजुरांना मागील तीन महिन्याचे किमान तीन हजार रुपये दरमहा आर्थिक अनुदान देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
===Photopath===
280521\img-20210528-wa0019.jpg
===Caption===
photo