नीट,जेईई क्लासेसचा लाखोंचा खर्च कसा करणार? आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण द्या

By गणेश वासनिक | Published: March 23, 2023 01:03 PM2023-03-23T13:03:10+5:302023-03-23T13:04:59+5:30

नवीन योजना तयार करण्याची मागणी; ट्रायबल फोरमचा पुढाकार, आदिवासी मंत्री, आयुक्तांना पत्र

Provide free training to tribal students, demand of tribal Forum to State Govt | नीट,जेईई क्लासेसचा लाखोंचा खर्च कसा करणार? आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण द्या

नीट,जेईई क्लासेसचा लाखोंचा खर्च कसा करणार? आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण द्या

googlenewsNext

अमरावती : डॉक्टर, इंजिनिअर या पदांच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना नीट,जेईई या पात्रता परीक्षा द्याव्या लागतात. या पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी क्लासेस लावावे लागतात. या क्लासेसचा खर्च वर्षाला दोन ते चार लाख रुपये येतो. परिणामी आदिवासी विद्यार्थी लाखोंचा एवढा खर्च कोठून कसा करणार? असा सवाल उपस्थित करीत महाज्योतीच्या धर्तीवर टीआरटीआयनेही आदिवासी विद्यार्थ्यांना डाँक्टर, इंजिनिअर या पदांच्या अभ्यासक्रमासाठी द्यावी लागणारी नीट,जेईई पात्रता परीक्षेच्या तयारीकरीता पूर्व परीक्षा मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची मागणी ट्रायबल फोरम संघटनेने केली आहे. 

विद्यार्थ्यांची डॉक्टर व इंजिनिअर बनण्याची इच्छा असली तरी पालकांची आर्थिक परिस्थिती आणि क्लासेसचे शुल्क भरण्याची परिस्थिती नसल्यामुळे इयत्ता दहावी नंतर अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश प्रवेश घेऊ इच्छित असलेले सामान्य, साधारण कुटुंबातील आदिवासी विद्यार्थी नीट,जेईईचे महागडे प्रशिक्षण क्लासेस लावू शकत नाही. आदिवासी समाजातील सर्व सामान्य कुटुंबातील मुले -मुली डाॅक्टर, इंजिनिअर झाले पाहिजे, यासाठी त्यांना नीट, जेईई परीक्षा पूर्व मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिलेली आहे आणि त्यातील जे विद्यार्थी इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन नीट, जेईईची तयारी करुन डॉक्टर, इंजिनिअर होण्याची स्वप्ने बाळगून आहे. अशा आदिवासी विद्यार्थ्यांना नीट व जेईईचे परीक्षा पूर्व मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्यासाठी योजना तयार करुन प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी ट्रायबल फोरमने केली आहे. या संदर्भात आदिवासी मंत्री डॉ. विजयकुमार गावित,आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांना ईमेलद्वारे पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे.

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेने ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी नीट,जेईई मोफत प्रशिक्षण असलेली चांगली योजना तयार केली आहे. याच धर्तीवर आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्धेने सुद्धा आदिवासी विद्यार्थ्यांच्या हितासाठी अशीच योजना तयार करुन लाभ द्यावा म्हणून पत्रव्यवहार केलेला आहे.

- ॲड. प्रमोद घोडाम, संस्थापक अध्यक्ष, ट्रायबल फोरम महाराष्ट्र.
 

Web Title: Provide free training to tribal students, demand of tribal Forum to State Govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.