आयपीडीएस योजनेकरिता तातडीने निधी उपलब्ध करून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:14 AM2021-09-23T04:14:42+5:302021-09-23T04:14:42+5:30

अमरावती: शहरात राबविण्यात आलेल्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत (आयपीडीएस)च्या प्रलंबित कामाला आवश्यक २.३१ कोटींचा निधी उपलब्ध ...

Provide immediate funding for the IPDS scheme | आयपीडीएस योजनेकरिता तातडीने निधी उपलब्ध करून द्या

आयपीडीएस योजनेकरिता तातडीने निधी उपलब्ध करून द्या

Next

अमरावती: शहरात राबविण्यात आलेल्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत (आयपीडीएस)च्या प्रलंबित कामाला आवश्यक २.३१ कोटींचा निधी उपलब्ध करण्याचे माजी राज्यमंत्री डॉ.सुनील देशमुख यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे केलेली विनंती ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी मान्य करून हा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश डॉ. राऊत यांनी महावितरणला मंगळवारी दिले.

देशमुख यांनी केलेल्या मागणीवर चर्चा करण्यासाठी ऊर्जामंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. ऊर्जामंत्र्यांच्या निर्देशानंतर महावितरणच्या अंतर्गत निधीतून २.३१ कोटींची तरतूद अमरावतीतील या प्रकल्पासाठी केली जाईल अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. बैठकीला महावितरणचे संचालक प्रकल्प भालचंद्र खंडाईत,मराविमं सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे, ऊर्जा सचिव दिनेश वाघमारे यांचीही उपस्थिती होती तर व्हिसीला

मुख्य अभियंता अमरावती परिमंडळ पुष्पा चव्हाण,अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे,दीपक देवहाते, कार्यकारी अभियंता आनंद काटकर,भारतभूषण औगड यांची उपस्थिती होती.

शहरात एकात्मिक ऊर्जा विकास योजना राबविण्यात आली. ८४.७० कोटींच्या या योजनेत ३३ केव्हीचे दसरा मैदान व शंकर नगर असे दोन उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आले. तसेच या योजनेंतर्गत १८५ किमी उच्चदाब व ११० किमी लघुदाब वाहिन्या भूमिगत करण्यात आल्या आहेत. तसेच १०५ किमीची एरियल बंच केबल टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले.परंतु या योजनेंतर्गत भूमिगत झालेल्या वाहिन्यावरील ओव्हरहेड लाईन काढण्याचे व भूमिगत वाहिनी चार्ज करण्याचे काम समाविष्ट नसल्याने एकात्मिक ऊर्जा विकास योजनेचे काम पूर्ण होऊनही भूमिगत वाहिन्या चार्ज करण्यात आल्या नव्हत्या. दरम्यान, जिल्हा नियोजन व महावितरणच्या प्रत्येकी ५० लाख निधीतून काही भागातील भूमिगत वीज वाहिनी वापरात आणली आहे,परंतु उर्वरित कामासाठी २.३१ कोटींच्या निधीची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Provide immediate funding for the IPDS scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.