वयोवृद्ध व्यक्तींसाठी मोबाईल लसीकरण व्हॅन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:12 AM2021-05-22T04:12:24+5:302021-05-22T04:12:24+5:30
अमरावती : महापालिके अंतर्गत सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लसीकरण केंद्रांवर गर्दी वाढत असल्याने वृद्धांना ...
अमरावती : महापालिके अंतर्गत सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लसीकरण केंद्रांवर गर्दी वाढत असल्याने वृद्धांना रांगेत उभे राहणे शक्य नाही. त्यामुळे मोबाईल लसीकरण व्हॅनची सुविधा ज्येष्ठ नागरिकांकरिता सुरू करण्याची मागणी शिवसेनेचे विभागप्रमुख सचिन ठाकरे यांनी केली.
बहुतांश लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांना डोस देणे सुरू आहे. परंतु, ७० ते ९० वयोगटातील व्यक्तींना गर्दीत उभे राहणे शक्य नाही. काही अंथरुणाला खिळले असल्याने त्यांना केंद्रावर लसीकरणासाठी नेणे शक्य नाही. त्यामुळे अशा व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहत असल्याने महापालिकेअंतर्गत मोबाईल लसीकरण व्हॅन सुरू केल्यास अशा नागरिकांना लस घेणे शक्य होईल. यासाठी महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांना सचिन ठाकरे यांच्या नेतृत्त्वात निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.