आरोग्य यंत्रणेला आवश्यक ती साधने पुरवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 05:00 AM2020-04-11T05:00:00+5:302020-04-11T05:00:00+5:30
पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रशासनाकडून कोरोनासंबंधी दैनंदिन आढावा घेतला. जिल्ह्यात अद्याप एक मृत व त्याच्या संपर्कातील तीन व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. जिल्हा सामान्य रुग्णालयात ४ हजार २०४ नागरिकांची तपासणी होऊन त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. अत्यंत काळजीपूर्वक तपासणी होत आहे. आवश्यकतेनुसार पुन:चाचणी केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत शासकीय व खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कक्षसेवक यांच्या सुरक्षिततेची काळजी रुग्णालय प्रशासनाने घ्यावी. आरोग्य यंत्रणेला आवश्यक सर्व साधने उपलब्ध करावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले. सर्व जण खंबीर राहून याही परिस्थितीवर मात करू, असा विश्वास शुक्रवारी त्यांनी व्यक्त केला.
पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रशासनाकडून कोरोनासंबंधी दैनंदिन आढावा घेतला. जिल्ह्यात अद्याप एक मृत व त्याच्या संपर्कातील तीन व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. जिल्हा सामान्य रुग्णालयात ४ हजार २०४ नागरिकांची तपासणी होऊन त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. अत्यंत काळजीपूर्वक तपासणी होत आहे. आवश्यकतेनुसार पुन:चाचणी केली जात आहे. खासगी रुग्णालयांनीही आपल्या कर्मचाऱ्यांना एन-९५ मास्क, ग्लोव्ह्ज व इतर आवश्यक साधने उपलब्ध करावी. त्यांना पुरेशी विश्रांती मिळेल, याची दक्षता घेतली जावी. त्यांचे मासिक वेतन वेळेवर अदा करावे व कर्तव्यावर उपस्थित होण्याकरिता वाहतुकीची व्यवस्था करावी, असे निर्देश पालकमंत्री ठाकूर यांनी दिले.