वरूड शहराला नियमित पाणीपुरवठा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:12 AM2021-07-31T04:12:49+5:302021-07-31T04:12:49+5:30
वरूड : शहराचा विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. चौथ्या-पाचव्या दिवशी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला ...
वरूड : शहराचा विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. चौथ्या-पाचव्या दिवशी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मुख्याधिकारी नगर परिषद यांना निवेदन देण्यात आले. तात्काळ पाणीपुरवठा नियमित न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
वरूड शहराला गेल्या अनेक वर्षांपासून दोन दिवसानंतर पाणीपुरवठा सुरू होता. अलीकडच्या काही महिन्यांपासून चार ते पाच दिवसांनंतर पाणीपुरवठा सुरू केल्याने नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. वेळेचेसुद्धा नियोजन न बाळगता पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांची तारांबळ उडते. नगर परिषदेने नियमित आणि वेळानुसार पाणीपुरवठा करावा, या मागणीकरिता शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मुख्याधिकारी रवींद्र पाटील यांना निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक महेंद्र देशमुख, शहराध्यक्ष जितेन शहा, माजी नगरसेवक विलास उघडे, आकाश बेलसरे, संजय कानुगो, अन्सार बेग, महिला शहराध्यक्ष प्रज्ञा बोडखे, स्वप्निल आजनकर, निखिल बनसोड, विकास खाडे, सूरज वडस्कर, हर्षल गलबले, जगबीरसिंह यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.