अल्पभूधारकांच्या पाल्यांना नोकरीत आरक्षण द्या
By admin | Published: September 2, 2015 12:10 AM2015-09-02T00:10:27+5:302015-09-02T00:10:27+5:30
जिल्हा कार्यकारिणीची बैठक विदर्भाध्यक्ष वसंत लुंगे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी पार पडली.
बैठक : भारत कृषक संघटनेची मागणी
अमरावती : जिल्हा कार्यकारिणीची बैठक विदर्भाध्यक्ष वसंत लुंगे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी पार पडली. सभेला अमरावती जिल्ह्यातील अनेक प्रतिनिधी उपस्थित होते. सभेत वाढत्या शेतकरी आत्महत्यांबाबत चर्चा करण्यात आली. दरम्यान अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या पाल्यांना नोकरीत २५ टक्के आरक्षण मिळावे, यासाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. दीपक लोखंडे, सतीश माहोरे, जगदीश कुचे, गजानन वानखडे, संजय हरणे, शिवानंद पाटील आदींनी विचार व्यक्त केले.
स्वामीनाथन समितीने केलेल्या शिफारशीचा अंमल होत नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढताहेत. त्याकरिता शासनाने पात्र अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या पाल्यांना नोकरीत २५ टक्के आरक्षण देऊन शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढता येऊ शकते, असे प्रतिपादन जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत डॉ. वसंत लुंगे यांनी केले. भारत कृषक समाजाच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण झाले असून आंदोलनाकरिता २ आॅक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त भारत कृषक समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजय जाखड यांच्या अध्यक्षतेत राज्यस्तरीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात करण्यात आले आहे. मेळाव्यात शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात येणार आहे.
सभेला दीपक लोखंडे, किशोर गुल्हाने, प्रमुख शीतल चव्हाण, सतीश माहोरे, गजानन वानखडे, वसंतराव मानकर, अरुण रामेकर, सुरेश पेटे, अरविंद गायकवाड, मंगेश कोल्हे, जगदीश लाड, बंडूभाऊ कथीलकर, सतीश खरबडे, मोहन पावडे, विजय मानकर, संजय हरणे, रणजीत तिडके, राजेश मरोडकर आदी उपस्थित हाते.