सूक्ष्म सिंचनासाठी २५0 कोटींची तरतूद

By admin | Published: June 7, 2014 11:41 PM2014-06-07T23:41:26+5:302014-06-07T23:41:26+5:30

सूक्ष्म सिंचन अनुदानासाठी केंद्राकडून यंदा २५0 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्राच्या मान्यतेनंतर राज्य शासनाने त्यांच्या वाट्याची रक्कम व सूक्ष्म सिंचनाचा प्रस्ताव

A provision of 250 crores for micro irrigation | सूक्ष्म सिंचनासाठी २५0 कोटींची तरतूद

सूक्ष्म सिंचनासाठी २५0 कोटींची तरतूद

Next

केंद्राचा निधी : दोन वर्षांच्या थकीत अनुदानासाठी स्वतंत्र मागणी
अमरावती : सूक्ष्म सिंचन अनुदानासाठी केंद्राकडून यंदा २५0 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
केंद्राच्या मान्यतेनंतर राज्य शासनाने त्यांच्या वाट्याची रक्कम व सूक्ष्म सिंचनाचा प्रस्ताव मान्यतेसाठी कृषी आयुक्तालयामार्फत शासनाला सादर केला आहे. शासन मान्यतेनंतर उपलब्ध निधीच्या र्मयादेत चालू वर्षात लाभार्थींची निवड करण्यात येणार आहे.
शाश्‍वत शेती अभियानात यावर्षीपासून सूक्ष्म सिंचन योजनेचा समावेश करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी आता सुरू होणार आहे.
लाभार्थींच्या अनुदान वाटपासाठी केंद्राच्या वाट्यातून २५0 कोटी रूपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. सोबतच यापूर्वीच्या थकीत अनुदानाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा योजनेच्या अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण बदल प्रस्तावित आहेत. सूक्ष्म सिंचन अनुदान वाटपासाठी प्रचलित ‘मागेल त्या पात्रताधारकाला अनुदान’ ही पद्धत या वर्षीपासून बंद करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
प्रचलित पद्धत
होणार बंद
मागेल त्या पात्रताधारकाला अनुदान ही प्रचलित पद्धत आता बंद होणार आहे. याऐवजी केंद्र व राज्याकडून उपलब्ध निधीतून तेवढय़ाच लाभार्थ्यांना अनुदान मिळणार आहे. जास्तीचे प्रस्ताव रद्दबातल ठरविण्यात येतील. पुढील वर्षी शेतकर्‍यांना नव्याने प्रस्ताव सादर करावे लागतील.
पूर्व परवानगीनंतर खरेदी प्रक्रिया
ई-ठिबक या ऑनलाईन यंत्रणेतून ही सर्व प्रक्रिया पार पडणार आहे. कृषी विभागामार्फत केंद्र व राज्य शासनाचे अनुदान उपलब्ध होईल. त्या प्रमाणानुसार लाभार्थ्यांना सूक्ष्म सिंचनाचे संच बसविण्याची अनुमती देण्यात येईल. यापूर्वीचे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत. पूर्व परवानगीनंतर शेतकर्‍यांनी खरेदी प्रक्रिया पार पाडावी.
 

Web Title: A provision of 250 crores for micro irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.