६० हजार शिक्षकांसाठी पाच हजार कोटींची तरतूद - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 01:23 PM2023-01-12T13:23:13+5:302023-01-12T13:23:51+5:30

रणजीत पाटील यांच्या समर्थनार्थ जनसंवाद सभेत ग्वाही

Provision of 5 thousand crores for 60 thousand teacher says Devendra Fadnavis | ६० हजार शिक्षकांसाठी पाच हजार कोटींची तरतूद - देवेंद्र फडणवीस

६० हजार शिक्षकांसाठी पाच हजार कोटींची तरतूद - देवेंद्र फडणवीस

Next

अमरावती : विनाअनुदानित शिक्षकांसाठी आम्ही टप्प्याटप्प्यात अनुदान दिले. ११०० कोटी आज बजेटमध्ये दिसत आहे. ६० हजार शिक्षकांना पैसे देण्याची हिंमत आम्ही दाखवली. तीन वर्षात पाच हजार कोटींवर ही रक्कम जाईल, काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने शिक्षकांना फक्त झुलवायचे काम केल्याचा घणाघात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केला.

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघात भाजप,शिवसेना (बाळासाहेब) व रिपाइं (आठवले गट) युतीचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अनुषंगाने येथील दसरा मैदानात आयोजित जनसंवाद सभेला ना. फडणवीस संबोधित करीत होते. व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खा. रामदास तडस, खा. प्रतापराव जाधव, खा. अनिल बोंडे, खा. नवनीत राणा, आ. प्रवीण पोटे, आ. रवी राणा, आ. चैनसुख संचेती, आ. निलय नाईक, आ. संजय कुटे, आ. रणधीर सावरकर, आ. राजेंद्र पाटणी, आ. हरीश पिंपळे, आ. श्वेता महाले, आ. प्रकाश भारसाकळे, आ. मदन येरावार, आ. प्रताप अडसड, आ. संजीव रेड्डी, आ. खंडेलवाल, आ. नामदेव सुसाळे, आ. आकाश फुंडके, आ. अशोक उईके, प्रदेश संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्यासह विभागातील पाचही जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

फडणवीस पुढे म्हणाले, मुख्यमंत्री असताना माझ्या सर्वच खात्यांचे राज्यमंत्री म्हणून डॉ. रणजित पाटील यांनी समर्थपणे कारभार सांभाळला आहे. सभागृहात मी नसलो तरी त्यांनी समर्थपणे प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. सदस्यांचे समाधान झाले नाही म्हणून मुख्यमंत्र्यांना बोलवा,असे कधीच झाले नाही. आता राज्यमंत्री नसल्याने त्यांची प्रकर्षाने आठवण येत असल्याचे ते म्हणाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनीदेखील यापूर्वीच्या महाआघाडी सरकारवर टीका करीत राज्य सरकारच्या सहा महिन्यातील कार्यकाळाविषयी गौरवोद्गार काढले. कार्यक्रमात खासदार-आमदार राणा दाम्पत्याने युवा स्वाभिमान पक्षाचा पाठिंबा डॉ. रणजित पाटील यांना असल्याचे पत्र देवेंद्र फडणवीस यांना दिले.

Web Title: Provision of 5 thousand crores for 60 thousand teacher says Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.