शासकीय यंत्रणांनी आगीबाबत समाजात जनजागृती करावी!

By admin | Published: April 24, 2017 12:45 AM2017-04-24T00:45:23+5:302017-04-24T00:45:23+5:30

वाढत्या उष्णतामानामुळे काही दिवसांपासून शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आगी लागत आहे.

Public agencies should create awareness in the society! | शासकीय यंत्रणांनी आगीबाबत समाजात जनजागृती करावी!

शासकीय यंत्रणांनी आगीबाबत समाजात जनजागृती करावी!

Next

पालकमंत्र्यांचे निर्देश : बचावात्मक उपाययोजना करा
अमरावती : वाढत्या उष्णतामानामुळे काही दिवसांपासून शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आगी लागत आहे. यासंदर्भात आगीपासून नागरिकांचा बचाव करण्याकरिता व होणाऱ्या जीवित व वित्तहानी रोखण्याकरिता दक्षता घेण्याबाबत उद्योग खनिकर्म पर्यावरण व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आवाहन केले आहे.
पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण, सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस यंत्रणा, मुख्याधिकारी सर्व नगरपरिषद यांना आगीपासून बचाव करण्याकरिता शहरस्तरावर व ग्रामस्तरावर तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांचे सहकार्य घेऊन जनजागृती करण्याबाबत निर्देश दिले. तसेच राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग शहरातील रस्त्याच्या आजूबाजूची झाडे तोडल्या जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. अशा दोषींविरुद्ध कडक कार्यवाही करावी. घराभोवती, झाडाच्या पाराभोवती किंवा सार्वजनिक ठिकाणी असलेला केरकचरा जाळू नये. संबंधित नागरिक असे करीत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचेवर पोलीस कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
वाढत्या उष्णतामानामुळे आगीपासून बचावासाठी पुढीलप्रमाणे सूचनांचे काटेकोर पालन करावे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण, तसेच सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस यंत्रणा, सर्व मुख्याधिकारी नगरपरिषद यांनी आगीपासून बचावासाठी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचे ना. पोटे यांनी निर्देश दिलेत.
काय करावे व काय करु नये !
घरोसमोरील परिसरातील किंवा गुरांच्या गोठ्याभोवती असलेला केरकचरा जाळू नये. घराच्या भोवताल किंवा गुरांच्या गोठ्याभोवती कचरा किंवा जळावू वस्तू जसे कडबा व कुटार ठेवू नये. स्वत:च्या कपड्यांना आग लागल्यास जमिनीवर लोळून विझविण्याचा प्रयत्न करावा. शेतातील धुरांवर जाळ करताना खबरदारी घ्यावी. फटाके फोडताना सार्वजनिक ठिकाणी फोडणे धोक्याचे आहे. ज्या ठिकाणी जळावू साहित्य आहे त्या ठिकाणी किंवा शेतामध्ये इतर ठिकाणी शक्यतोवर फाटके फोडू नये. घरातील जुनी विजेची तारे व उपकरणे शक्यतो बदलवून टाकावित. आपल्या घरामध्ये कामाच्या ठिकाणी अथवा सार्वजनिक ठिकाणी संकटकालीन बाहेर पडण्याचा मार्ग जाणून व नेहमी अडथळे विरहीत ठेवावे. घरातील कोठीवर पडकी जागा इत्यादी ठिकाणी कचरा तेलकट अथवा जळावू पदार्थ जमा करु नये. घरातील हिटर, गॅस इत्यादीपासून कपडे, पडदे व लाकडी वस्तु कमीत कमी तीन फूट लांब ठेवाव्यात. काडीपेट्या, केरोसीन, अत्तर, इस्त्री या वस्तू लहान मुलांपासून दूर ठेवाव्यात. स्वयंपाकघरातील सिलिंडरचा रेग्युलेटर बंद ठेवावा. चुलीतील विस्तव पूर्ण विझल्याबाबत खात्री करून घ्यावी. झोपताना दिवा लांब ठेवावा किंवा बंद ठेवावा. ज्वालाग्राही वस्तू असल्यास शक्यतो दूर ठेवाव्यात. आग लागल्यास लगेच अग्निशमन दलाला टोल फ्री क्र. १०१ व कार्यालय दूरध्वनी क्र. ०७२१-२५७६४२६ व सर्व नगरपरिषद येथील दूरध्वनी क्रमांकावर तत्काळ संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

Web Title: Public agencies should create awareness in the society!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.