बऱ्हाणपूर येथे मुलींच्या आरोग्याबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:14 AM2021-02-16T04:14:53+5:302021-02-16T04:14:53+5:30

मोर्शी : तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील जिल्हा परिषद शाळेत मुलींचे आरोग्य, शिक्षण व सुरक्षितता या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रम पार पडला. ...

Public Awareness on Girls' Health at Barhanpur | बऱ्हाणपूर येथे मुलींच्या आरोग्याबाबत जनजागृती

बऱ्हाणपूर येथे मुलींच्या आरोग्याबाबत जनजागृती

Next

मोर्शी : तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील जिल्हा परिषद शाळेत मुलींचे आरोग्य, शिक्षण व सुरक्षितता या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तथा सरपंच जयश्री पाटणकर होत्या. कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून विचोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका वीणा चव्हाण, तर प्रमुख अतिथी म्हणून अंगणवाडी सेविका विमल ढगे, आशा वर्कर ज्योती खुळे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अनिल भोंडे, धनश्री गायकी, जयश्री ढेवले, वंदना तुळे उपस्थित होत्या. मुलींच्या आरोग्याची काळजी व त्यांच्या समस्या तसेच कोरोनाकाळात घ्यावयाच्या दक्षतेबाबत वीणा चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक नीलेशकुमार इंगोले यांनी मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व व सुरक्षेची जबाबदारी पटवून दिली. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तथा सरपंच जयश्री पाटणकर, सदस्य सविता शेकार, अनिल भोंडे, शंकर शेकार, रवींद्र भागवत, सहायक शिक्षक दिलीप चांदुरे, वर्षा ढगे, अर्चना ढेवले, अर्चना खुळे, संगीता ढगे, रत्नप्रभा लव्हाळे, राणी अवघड, दर्शना भागवत, शारदा शेकार, नर्मदा शेरे, किसना वाकपैजण, मनोरमा इसळ, रजनी काळे, मंगला ढेवले, शारदा तुळे, गौरी पाटणकर, रूपाली खुळे आदी उपस्थित होते.

Web Title: Public Awareness on Girls' Health at Barhanpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.